Chandrapur Crime News : चंद्रपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हा
Chandrapur Crime News : चंद्रपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हा
चंद्रपुरातील कोरपना इथल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत लोडे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकाचं नाव आहे. श्रीकांत लोडे हा आरोपी अमोल लोडेचा चुलत काका असून शाळेच्या संचालक मंडळात देखील त्याचा समावेश आहे. दरम्या आरोपी अमोल लोडे युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष आहे. अमोल लोडेवर पॉक्सोच्या कलम २१ अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केलीय. हे प्रकरण माहित असूनही पोलिसात तक्रार केली नाही यामुळे श्रीकांत लोडेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.























