एक्स्प्लोर
Bhandara : लाखांदूर बाजार समिती सभापती, उपसभापती पदाची निवडणूक, नाना पटोलेंना यश मिळणार?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघातील लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. लाखांदूर बाजार समितीवर काँग्रेसचे 11 संचालक निवडून आलेत. लाखनी आणि भंडारा या दोन बाजार समित्या काँग्रेसच्या ताब्यातून गेल्या असून लाखांदूर बाजार समितीही ताब्यात घेण्यासाठी भाजप - शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसलीये. आज होणाऱ्या निवडणुकीत या तिन्ही पक्षाचे नेते काँग्रेसला पराभूत करण्याच्या दृष्टीने डावपेच आखत आहेत.
आणखी पाहा


















