Zero hour on Beed Crime Walmik Karad प्रकरणात आज काय काय घडलं?
Zero hour on Beed Crime : वाल्मिक कराड प्रकरणात आज काय काय घडलं?
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणातील चार फरार आरोपींच्या खाती असलेल्या 13 बँकांना सीआयडीच्या पथकाने खाती गोठवण्यासाठी पत्र दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चार फरारी आरोपींची बँक खात्यांची संख्या ही तीन आकड्यात आहे. आरोपींचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरील माहितीशी संलग्न असलेले ही सर्व खाती आहेत.
आज दिवसभरात नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील चार फरार आरोपींच्या खाती असलेल्या 13 बँकांना सीआयडीच्या पथकाने खाती गोठवण्यासाठी पत्र दिल्याची माहिती.
मालमत्ता जप्तीच्या संदर्भात सीआयडी पथकाने कार्यवाही पूर्ण केली असून न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा सध्या केली जात आहे. न्यायलयाचे आदेश प्राप्त होतात जप्तीची कारवाई देखील केली जाणार आहे.
आज दिवसभरात सीआयडीच्या पथकाने सुमारे 25 लोकांशी चौकशी केली आहे.
आतापर्यंत सीआयडीच्या पथकाने सुमारे 125 हून अधिक लोकांची प्राथमिक चौकशी केली आहे.
वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या महिलेची काल CID पथकने चौकशी केली होती, त्याच महिलेची आज पुन्हा एकदा सीआयडीच्या पथकाने चौकशी केली आहे. या महिलेकडे वाल्मीक कराड हा सुरुवातीच्या काही दिवस राहायला होता, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.