Aurangabad : लस न घेता लसीकरणाचं सर्टिफिकेट? ABP MAJHA
औरंगाबादेत लस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र देणाऱ्याना अटक करण्यात आली आहे. कोव्हीड -19 ची लस न घेता लस घेतल्याची नोंदणी करुन बनावट प्रमाणपत्र तयार करुन शासनाची फसवणुक करणा-या आरोपींना जिन्सी पोलीसांनी अटक केली आहे.
शेख रझीउद्दीन फहीमउद्दीन डॉक्टर, अबुबकर अल हमीद पिता हादी अल हमीद मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अशपाक .यांना अटक करण्यात आलीय. आरोपी लोकांकडुन आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक घेवून आरोपी नामे शेख मोहीउद्दीन शेख फहीम नावाचा डॉक्टर याचे व्हॉट्सअपवर पाठवत असे आणि तो प्राथमिक आरोग्य केंद्र शिऊर आणि मनुर ता. वैजापुर, जि. औरंगाबाद येथील सिस्टर नामे श्रीमती आढाव आणि शहेनाज शेख यांचे मार्फतीने कोव्हीड -19 ची लस न घेता लस घेतल्याची नोंदणी करून खोटे बनावट प्रमाणपत्र तयार करुन लोकांकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र देत होते .या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .