PM Narendra Modi Ahmednagar Visit : शिर्डीच्या साई मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते आरती
PM Narendra Modi Ahmednagar Visit : शिर्डीच्या साई मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते आरती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (26 ऑक्टोबर 2023) अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) दौऱ्यावर येत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) आणि अकोले (Akole) या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा (PM Modi Public Meeting) होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar District Visit) येत आहेत. जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात नरेंद्र मोदी साईबाबांच्या समाधीच दर्शन (Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi) घेऊन करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.
2018 मध्ये साईबाबांच्या समाधीचं शताब्दी वर्ष होतं. या सोहळ्याची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातावरणकुलीत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.