एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : नाशिकमधील मजुराच्या पोटात घुसलेली 4 फुटांची सळी काढण्यात यश
नाशिकमधील बांधकाम मजुराच्या पोटात घुसलेल्या सळ्या बाहेर काढण्यात मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आलं आहे. पाच तासांच्या ऑपरेशननंतर सलीम शेखला जीवदान मिळालं.
नाशकातील लासलगावात 8 मार्चला बांधकाम सुरु असताना सलीम शेख पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळला. त्यामुळे एक सळी थेट त्याच्या पोटात घुसून खांद्यातून बाहेर आली. 4 फूट लांब आणि 8 मिलीमीटर जाडीची ही सळी सलीमच्या शरीरात घुसून होती.
मजुरांनी ती सळी कापून सलीमला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. सलीमचं आतडं, यकृत, फुफ्फुस आणि मानेला सळीने अक्षरशः चिरलं होतं. त्यानंतर सलीमला तातडीने मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं.
तब्बल वीस तास ही सळी सलीमच्या शरीरात होती. डॉक्टरांसाठी हे एक आव्हानच होतं. या कालावधीत सलीम बेशुद्धावस्थेत होता. अखेर पाच डॉक्टरांच्या टीमने प्रयत्नांची शर्थ करत पाच तासांच्या ऑपरेशननंतर सलीमच्या शरीरातून ही सळी बाहेर काढली. सलीमची प्रकृती सध्या ठीक आहे.

महाराष्ट्र
Mumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलं
Mumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीत
Thane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवाना
Thane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्द
Panchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion