एक्स्प्लोर

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?

Radhakrishna Vikhe, Sujay Vikhe Majha Katta : राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) लढण्याचा सल्ला दिला होता, असा दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना केला आहे. एबीपी माझा कट्ट्यावर राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

काँग्रेस सोडण्यामागचा विचार काय होता? असे विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, 1991 च्या पराभवानंतर आमच्या सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्या. त्यावेळी पवार साहेब मुख्यमंत्री होते. 1995 च्या निवडणुकीत शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा मी काँग्रेस पक्षाचा आमदार झालो. परंतु 1991 सालच्या दरम्यान आम्हाला झालेल्या कोर्टाच्या त्रासाने मला मानसिक त्रास होत होता. त्यावेळी मी ठरवलं एकदा पक्षातून बाहेर निघून समोरासमोरच जाहीर भूमिका घेऊ. तेव्हा शंकरराव चव्हाण यांना भेटलो. त्यांना मी सांगितले की, मी पक्षात अस्वस्थ आहे. त्यांनी मला सांगितलं की, तू विचारपूर्वक निर्णय घे. त्यानंतर मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मी बाळासाहेबांना भेटलो, त्यांनी मला मानसन्मान दिला होता.

...म्हणून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय

सुजयच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही म्हणत होतो की, जागा आदलाबदल करा, औरंगाबादची जागा सलग बारा वेळेस काँग्रेस हरली आहे. नगर दक्षिणची जागा सलग तीन वेळेस राष्ट्रवादी हरली आहे. मी याबाबत पवार साहेबांना दोन चार वेळेस भेटलो. ते म्हणाले माझा कार्यकर्ता ऐकत नाही. पवार साहेब असं सांगताय त्यांचे कार्यकर्ते ऐकत नाही? यावर तुम्हाला तरी विश्वास बसेल का? त्यानंतर मी राहुल गांधींना भेटलो. त्यांनी मला सांगितले सुजय विखेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढायला सांगा. मी म्हटलं ऑल इंडियाचे अध्यक्ष जर मला असं सांगत असतील त्यापेक्षा मी भाजपमध्ये गेलेले कधीही चांगलं, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्यानंतर खरगे साहेब आले ते मला बोलले एवढं मनावर घेऊ नका, पाच वर्षानंतर आपण पाहू. मी सुजयला फोन केला, तू निर्णय कर, देवेंद्रजींना फोन कर आणि आम्ही भाजपमध्ये दाखल झालो, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल

Video : शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, लोकसभेतला पराभव, विधानसभेची संधी हुकल्यानंतर सुजय विखेंनी मन केलं मोकळं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथSpecial Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधीZero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget