एक्स्प्लोर

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं एका गद्दारासाठी त्यांच्याच पक्षाने अध:पतन केलं. अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबई : आम्ही जर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असता, तर तो आम्ही निश्चितपणे पाळला असता, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसेच महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप केले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. आता वरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल.  शरद पवारांनी नेमकं काय ठरवलं हे माझ्या इतकं कोणाला माहित नाही. सुरुवातीच्या चर्चा शरद पवार आणि माझ्यातच झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसू नये. त्यांना काहीच माहित नव्हतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.  

राजकारण शिवसेनेलाही येतं

ते पुढे म्हणाले की, आमचे सरकार बनत आहे हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांना धक्का बसला होता, पडता पडता वाचले, कोसळले असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे त्यांना समजल्यावर त्यांना वाटलं होतं शिवसेना काय करणार? आमच्या पायाशी येणार, अशी त्यांची भूमिका होती. मात्रा राजकारण शिवसेनेलाही येतं. आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून तुम्ही ते सरकार पाडलं. पाच वर्ष सरकार टिकावं अशी शरद पवार आणि आमची कमिटमेंट होती. त्यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालेले आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. 

अडीच वर्षांपूर्वीचा फौजदाराचा शिपाई झाला

आम्ही जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असता, तर तो आम्ही निश्चितपणे पाळला असता. पक्षाने त्यांच्यासमोरच घोषणा केली होती. प्रत्येक सभेत सांगितले होते. त्यानंतर जर ते बदलत असतील तर ते बरोबर नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता यावरून देखील संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस सध्या गोंधळलेलं व्यक्तिमत्व आहे. अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झाला त्यामुळे वैफल्य आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं एका गद्दारासाठी त्यांच्याच पक्षाने अध:पतन केलं. अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं.  

ते चर्चेस तयार नव्हते

25 वर्ष शिवसेनेबरोबर युती असताना तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्यामुळे फडणवीस खोटं बोलत आहेत. त्या प्रक्रियेत मी होतो मला माहित आहे ते कुठल्याही प्रकारची चर्चा करायला तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितलं जात होतं.  आमचं असं म्हणणं होतं की आपलं जे ठरलेले आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटलंय.  

आणखी वाचा 

Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Adani Stocks : हिंडेनबर्ग रिसर्च बंद झालं, अदानींच्या शेअर मध्ये जोरदार तेजी, शेअर बाजारात काय घडतंय?
हिंडेनबर्ग रिसर्च बंदची घोषणा, अदानींच्या शेअर मध्ये जोरदार तेजी, शेअर बाजारात काय घडतंय?
Dhananjay Munde: राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
Embed widget