Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Pune Crime: ग्राहकाने आणि त्याच्या दोन मित्रांनी थेट स्नॅक्स सेंटर मधील विक्रेत्याला मारहाण केली. स्नॅक्स सेंटरमध्ये त्यांनी तोडफोड केली, विक्रेत्याला काचेची बरणी फेकून मारली.
पुणे: प्रत्येकाला वडापाव गरमागरमच पाहिजे असतो. गरम वडापाव खाण्यात एक वेगळीच मजा असते. खाण्या-पिण्याचे शौकीन असलेल्यांना तर त्यांच्या मनाप्रमाणे खाद्यपदार्थ मिळाले नाहीत तर ते आकांततांडव करतात. अशीच एक घटना पुण्यातील बालेवाडी परिसरात घडली आहे. एका स्नॅक्स सेंटरमध्ये वडापाव विक्रेत्याने गार वडापाव दिल्याचं पाहून ग्राहकाचा पारा चढला. त्यानंतर ग्राहकाने आणि त्याच्या दोन मित्रांनी थेट स्नॅक्स सेंटर मधील विक्रेत्याला मारहाण केली. स्नॅक्स सेंटरमध्ये त्यांनी तोडफोड केली, विक्रेत्याला काचेची बरणी फेकून मारली.
नेमकं काय घडलं?
पुण्यात अगदी क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील बालेवाडी परिसरात वडापाव थंडगार असल्याने तिघांनी विक्रेत्याला काचेची बरणी फेकून मारत तोडफोड केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय 45, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश कोंडिबा ढेबे (वय 23) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर देखील मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेलल्या माहितीनुसार, जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साई चौकात शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्या ठिकाणी दुपारीच्या सुमारास अंकुश कोंडिबा ढेबे आणि त्याचे दोन मित्र स्नॅक्स सेंटरवर आले होते. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील चहाचे थर्मास खाली फेकून तो फोडला. अंकुश कोंडिबा ढेबे याने काउंटरवरील काचेची बरणी हातात घेऊन ती प्रकाशचंद्र जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. बाणेर पोलिस तपास करत आहेत.
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर
मित्राने आपल्या मैत्रीणीला रस्त्यात अडवून मारहाण केली. यामध्ये त्या तरूणीचा जबडा फॅक्चर झाला आहे. मैत्रीण असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून 'दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा संबंध काय आहे?' अशी विचारणा केली आणि तिला गंभीर मारहाण करून तिचा जबडा फॅक्चर (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजी नगरमधील (Pune Shivajinagar) मॉडल कॉलनी परिसरात घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी रोहन जगन्नाथ कदम (वय 27, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदिराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वानवडीत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस (Pune Shivajinagar) ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी रोहन कदम हे मित्र-मैत्रीण आहेत.