WEB EXCLUSIVE : चर्चेत असणारेच ट्रोल होतात, 'समांतर 2'मधील इंटिमेट सीनवर तेजस्विनीचं उत्तर
समांतर 2 चा नवा सीझन आता यायच्या मार्गावर आहे. त्याचा ट्रेलरही आला आहे. पहिल्या सीझनला नेटिझन्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुमार महाजनला पडलेले प्रश्न आणि त्याच्या समोर आलेल्या वहीने अनेकांची उत्कंठा वाढवली. आता दुसऱ्या सीझनमध्ये कुमारसमोर नवीन काय वाढून ठेवलं आहे त्याची लोक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. गेल्या सीझन गाजलाच. पण त्याचवेळी समांतरमधल्या एका दृश्याची खूप चर्चा झाली. तो होता मिस्टर आणि मिसेस महाजन यांच्यातला इंटिमेट सीन. त्यावरुन तेजस्विनी पंडितला भल्या बुऱ्या प्रतिक्रियांना समोरं जावं लागलं. आता दुसऱ्या सीझनच्या निमित्ताने तेजस्विनीशी बातचित करताना तिने अनेक प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरं दिली.























