SSR Suicide Case | मुंबई पोलीस की सीबीआय? तपास कोण करणार? सुप्रीम कोर्ट निकाल देणार!
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी कोण करणार, मुंबई पोलीस की सीबीआय यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकतं. आज सर्व पक्षकार सुप्रीम कोर्टात लेखी स्वरुपात युक्तिवाद मांडतील. त्यानंतर सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने करायचा की मुंबई पोलिसांनी हे सुप्रीम कोर्टाला ठरवायचं आहे.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (11 ऑगस्ट) या प्रकरणी आपला आदेश सुरक्षित ठेवून सर्व पक्षकारांना आपला युक्तिवाद लेखी स्वरुपात जमा करण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती यांनी सीबीआयच्या वतीने दाखल एफआयआर मुंबई पोलिसांना सोपवण्याची मागणी केली आहे. तर बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी याचा विरोध केला आहे.





















