एक्स्प्लोर
IT Raids On Anurag Kashyap, Taapsee Pannu | अनुराग आणि तापसीची 38 तासांपासून चौकशी
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान या दोघांशी संबंधीत ऑफिसेस आणि मालमत्तांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आलेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांमधील एकूण 28 ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप हे सिनेमाच्या शूटिंगसाठी पुण्यातील वेस्टीन हॉटेलमधे थांबलेले असताना तिथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीमध्ये या दोघांशी संबंधीत मिडीया प्रोडक्शन कंपनीला सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जितका फायदा झालाय त्यापैकी 300 कोटी रुपयांचा हिशेब देण्यात हे दोघे असमर्थ ठरल्याच इनकम टॅक्स विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटंल आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























