Dharmendra Birthday :100 हिट सिनेमे देणारे सगळ्यात यशस्वी नायक 'धर्मेंद्र', पब्लिसिटीअभावी पिछाडीवर
शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, काहीही काय? बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त हिट चित्रपट देणाऱ्यांची यादी पाहिली तर त्यात ज्युबिलीकुमार राजेन्द्र कुमार, राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांची नावे प्रामुख्याने घेतलेली दिसतात. याशिवाय देव आनंद, राज कपूर, शम्मी कपूर यांचे चित्रपटही प्रचंड यशस्वी झालेले दिसून येतात. असे असले तरी ही-मॅन धर्मेंद्र या सगळ्या नायकांपेक्षा किती तरी पावले पुढे आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण धर्मेंद्रने थोडे थोडके नव्हे तर तब्बल 100 हिट सिनेमे दिलेत. 8 डिसेंबर हा धर्मेंद्रचा वाढदिवस आहे. त्यनिमित्ताने त्याच्या या कारकिर्दीची माहिती एबीपी माझाच्या वाचकांसमोर आम्ही ठेवत आहोत.























