एक्स्प्लोर
Sooryavanshi Film : 'सूर्यवंशी' चित्रपटानं प्रदर्शित होण्यापूर्वीच जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला...
अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी' चित्रपटानं प्रदर्शित होण्यापूर्वीच 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा 'सूर्यवंशी' आज देशभरातल्या 5 हजारां पेक्षा जास्तं स्क्रीन्सवर प्रदर्शित होतो आहे. चित्रपटाचे ओटीटी हक्क 200 कोटींना विकले गेलेत तर, म्युझिकचे हक्क विकून 60 कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी 200 कोटी रुपये इतका खर्च आल्याचं बोललं जातं असून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय.
आणखी पाहा























