UGC on 2 degree : देशात आता एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची मुभा, युजीसीची नवी नियमावली
आता पदवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार आहे. महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीनं एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची मुभा नुकतिच युजीसीने दिली आहे. यूजीसीचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेशकुमार यांनी काल याबाबतची घोषणा केली आहे. याची सविस्तर नियमावलीही यूजीसीकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमांचं शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. पूर्णवेळ पदवीचं शिक्षण घेताना डिप्लोमा किंवा अर्धवेळ पदवीचं शिक्षण घेता येत होतं. मात्र, या नव्य़ा नियमामुळे विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक स्वातंत्र्य मिळणार आहे. विद्यार्थ्य़ांनी त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाचा निर्णय घ्यावा, असं डॉ. जगदेशकुमार यांनी सांगितलंय.


















