HSC SSC Board Exams : बोर्ड परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय, दोन टप्प्यात घेण्यात येणार परीक्षा
बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. या दोन्ही भाषांपैकी एक भाषा ही भारतीय भाषा असणे अनिवार्य असणार आहे.












