एक्स्प्लोर
यशोमती ठाकूर यांच्याकडून 2012 मध्ये पोलिसांना मारहाण, अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध
अमरावती : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि सोबतच्या दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता. याप्रकरणी अमरावती न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली आहे.
आणखी पाहा























