कारवाईऐवजी मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला? नागपूर पोलीस महेश राऊतला न्याय कधी देणार? ABPMajha
नागपुरात पोलिसांच्या मारहाणीमुळे अपमानित झालेल्या महेश राऊत या तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मनोरुग्णाला मारहाण होत असल्याची माहिती महेश राऊतने पोलिसांना १०० नंबरवरून दिली.. यानंतर फोन महेशने पोलिसांचा फोन उचलला नाही म्हणून त्याला मारहाण झाल्याचा आरोप होतोय.भर वस्तीत लोकांसमोर झालेल्या मारहाणीमुळे तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. याआधी ७ जुलै रोजी नागपूरच्या पारडी भागात मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तिला हेल्मेट घातलं नाही म्हणून पोलिसांनी मारहाण केली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी पूर्ण व्हायच्या आधीच नागपूर पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे आणखी एक बळी गेल्याचा आरोप होतोय.























