एक्स्प्लोर
महाराष्ट्राचं प्रवेशद्वार भ्रष्टाचाराचं द्वार? चेकपोस्टवरील ही खुलेआम लूट कुणाच्या आशिर्वादाने सुरू?
नागपूर : महाराष्ट्राच्या प्रवेशदारावरच भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या आंतरराज्य सीमेवर परिवहन विभागाच्या चेक पोस्टवर काही गुंड प्रवृत्तीचे लोक ट्र्क चालकांकडून अवैध वसुली करत आहेत. एबीपी माझा समोर आपले गाऱ्हाणे मांडणाऱ्या ट्र्क चालकांनी या संदर्भात अवैध वसुलीचे सबळ पुरावेही समोर आणले. ट्रक चालकांचा आरोप आहे की एक हजार रुपयांची "अवैध देण" ( एंट्री ) दिल्याशिवाय कोणालाही या चेकपोस्टमधून महाराष्ट्रात प्रवेश करता येत नाही किंवा बाहेरही जाता येत नाही. अनेक ठिकाणी या प्रकारची तक्रार केल्यांनतरही कारवाई होत नसल्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे उघड भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप होतोय.
आणखी पाहा























