Amravati Love Jihad : अमरावतीमध्ये लव्ह जिहादचे प्रकरणं, अनिल बोंडेंचे गंभीर आरोप
अमरावती जिल्ह्यात आंतरधर्मीय विवाहानंतर तरुणीवर अत्याचार झाल्याचा आरोप भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलाय. आम्ही देखील मागे हटणार नाही.. जशास तसं उत्तर देऊ अशा शब्दात खासदार बोंडे यांनी इशारा दिलाय.. आंतरधर्मीय विवाहानंतर तरुणीला तीन दिवस डांबून ठेवल्यानं तिची प्रकृती ढासळल्याचा आरोप होतोय.. संबंधित तरुणीची भेट घेतल्यानंतर खासदार अनिल बोंडेंनी पोलिसांवर देखील हल्लाबोल केलाय. धारणी इथं रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या एका युवकानं उच्चशिक्षित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अवैधरित्या लग्न लावून घेतल्याचा आरोप आहे. तरुणीची प्रकृती ढासळल्यानंतर तिला अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खासदार बोंडे यांनी तिथं तरुणी आणि कुटुंबीयांची भेट घेतली आणि मदतीचं आश्वासन दिलं.
























