एक्स्प्लोर

Virat Kohli : '70 शतकं ठोकणं सोपी गोष्ट नाही, कपिल देव यांच्या 'त्या' वक्तव्यावर भडकले कोहलीचे बालपणीचे कोच

Kohli Childhood Coach : विराट कोहलीचा फॉर्म मागील काही काळापासून खास नसल्याने त्याच्यावर टीका होत असताना माजी कर्णधार कपिल देव यांनीही कोहलीबाबत एक कमेंट केली, ज्यानंतर क्रिकेट जगतातून बऱ्याच प्रतिक्रिया येताना दिसल्या.

Kapil Dev on Virat Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागील काही काळापासून खराब फॉर्मात असल्याने त्याच्यावर टीका होत आहेत. इंग्लंडविरुद्धही चांगल्या फॉर्मात असलेल्या दीपकच्या जागी विराटला संधी मिळाली. ज्यानंतर टीका आणखी वाढल्या कपिल देव यांनीही विराटच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळावी असं वक्तव्य केल्यावर बऱ्याच चर्चांना उधान आलं, ज्यानंतर आता विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी कपिल देव यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवत प्रतित्त्यूर दिलं आहे.

शर्मा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की,''कोहलीने 70 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली असून यातून त्याचं कौशल्य कळतं. कोणतीही मोठी गोष्ट घडली नसताना असं वक्तव्य का केलं आहे, कोहलीच्या बाबतीतच इतकी घाई का? मला वाटत नाही बोर्ड इतक्या लवकर त्याला बेंचवर बसवण्याचा निर्णय घेईल."

काय म्हणाले कपिल देव?

विराटच्या फॉर्मवर क्रिकेट जगतातून प्रतिक्रिया येत असताना  कपिल देव यांनी दिलेली प्रतिक्रिया बरीच चर्चेत आली. देव यांनी विराटबद्दल बोलताना म्हणाले,''आपण ज्या विराटला ओळखतो तसा खेळ त्याला खेळता येत नाही. विराटने धावा कराव्या असं मलाही वाटतं पण सध्या तो खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्यामुळे इतर चांगल्या युवांना संधी न मिळणं चूकीचं आहे. जर जगातील नंबर दोनचा आर आश्विन कसोटी संघाबाहेर बसू शकतो. तर नंबर एकचा विराट कोहलीही बाहेर बसल्यास काही चूकीचं नाही'' 

मागील अडीच वर्षात एकही शतक नाही

विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी-20 सामना श्रीलंकाविरुद्ध यावर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला होता. त्यानंतर आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलंNana Patole Nagpur : एक देश, एक निवडणूक वरून नाना पटोलेंची टीकाNitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊतPune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....
मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? प्रफुल पटेलांनी अजित पवार-प्रफुल पटेलांना सुनावलं
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Embed widget