एक्स्प्लोर

Kapil Dev on Virat Kohli : विराटचं प्रदर्शन खास नाही, अशात दमदार युवा खेळाडूंना बाहेर बसवणं योग्य नाही : कपिल देव

Kapil Dev on Team India: मागील काही काळापासून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म खास नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत आहेत. आता कपिल देव यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Virat Kohli : भारतीय क्रिकेटच नाही तर जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणजे विराट कोहली (Virat Kohli). पण मागील काही काळापासून विराट खराब फॉर्मने ग्रासला असल्याने त्याच्यावर टीका होत आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही एबीपी न्यूजशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विराट कोहली खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला संघात घेऊन चांगल्या फॉर्ममधील युवा खेळाडूंना बाहेर बसवणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

सध्या भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेत दुसऱ्या टी20 सामन्यात विराटच्या संघात येण्याने युवा खेळाडूंना बाहेर बसवावं लागलं. विराटच्या जागी दीपक हुडाला विश्रांती द्यावी लागली, हुडा कमाल फॉर्ममध्ये असताना असं झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत होते. ज्यानंतर कपिल देव यांची ही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. देव यांनी विराटबद्दल बोलताना म्हणाले,''आपण ज्या विराटला ओळखतो तसा खेळ त्याला खेळता येत नाही. विराटने धावा कराव्या असं मलाही वाटतं पण सध्या तो खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्यामुळे इतर चांगल्या युवांना संधी न मिळणं चूकीचं आहे. जर जगातील नंबर दोनचा आर आश्विन कसोटी संघाबाहेर बसू शकतो. तर नंबर एकचा विराट कोहलीही बाहेर बसल्यास काही चूकीचं नाही'' 

विराट कोहलीची धावांसाठी धडपड

विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी-20 सामना श्रीलंकाविरुद्ध यावर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला होता. त्यानंतर आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे.

आयसीसी कसोटी क्रमावारीच्या टॉप-10 मधून विराट बाहेर
आयसीसीनं नुकतीच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजाच्या क्रमावारीच्या टॉप-10 मधून विराट कोहली बाहेर पडलाय. तब्बल सहा वर्षानंतर विराट कोहली टॉ-10 मधून बाहेर पडलाय. इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यातही तो मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात विराट कोहलीला पहिल्या डावात 11 तर, दुसऱ्या डावात 20 धावा करता आल्या. परिणामी, आयसीसी कसोटी क्रमवारीत त्याची तीन स्थानांनी घसरण झाली असून तो सध्या 13 व्या स्थानावर पोहचलाय. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Loksabha Election 2024 India : देशात 102 तर राज्यात जागांवर मतदानChandrapur Varora : उष्माघाताचा त्रास झाल्यास मतदानकेंद्रावर काय काळजी घ्यावी ?Chandrapur Loksabha Election : प्रतिभा धानेकरांनी केलं मतदान; बाळू धानोरकरांच्या आठवणीत भावूकABP Majha Headlines : 8 AM  :19 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : चैत्री कामदा एकादशी निमित्त सुमारे दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल
Maharashtra News LIVE Updates : चैत्री कामदा एकादशी निमित्त सुमारे दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल
Embed widget