Zero Hour : समलिंगी विवाहांना विरोध ते काँग्रेसचं परिक्षण शिबीर, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
दीडशे वर्षांपासून एकीकडे कायदा आणि दुसरीकडे समलिंगी संबंध असा सुरू असलेला संघर्ष आज मिटेल असं वाटत होतं ... पण तसे झाले नाही ... १-२ नाही तर चक्क २१ याचिका ह्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडे होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने ३ विरुद्ध २ मतांनी समलिंगी विवाहांना मान्यतेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.. आणि समलिंगी संबंधांना लग्नाची मान्यता मिळावी, लग्नाच्या कायद्यात समलैंगिकही सामावून घेतले जावे ... हा त्यांचा लढा पुढेही सुरु ठेवावा लागणार हे आज स्पष्ट झाले. एक गोष्ट लक्षात आली की, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेचा विचार केला. समलिंगी विवाहाला विरोध करणारी भूमिका केंद्राकडून मांडण्यात आली होती.. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास तो कायदेमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप ठरेल, अशी भूमिका केंद्राने मांडली होती.
All Shows

































