Zero Hour : Kolhapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :नद्या-धरणं तरीही कोल्हापुरात पाणीटंचाई का?
तुम्ही पाहताय एबीपी माझा... आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर... झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्टस. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात कोल्हापूरला. मंडळी, कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आघाडी सरकारच्या काळात थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली होती. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी कोल्हापूर शहराच्या हद्दीत थेट पाईपलाईननं पाणी आलं. पण अजूनही या शहराला योजनेचा पूर्ण फायदा होत नसल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आजही पाण्यासाठी टँकरचा वापर करावा लागतोय. पाहुयात त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे महामुद्देमधला खास रिपोर्ट.
देशातील सर्वात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे पाहिलं जातं.... महापुराचा फटका तर कोल्हापूर शहराच्या पाचवीला पुजला आहे.... उसामुळं ऐन उन्हाळ्यात देखील हा जिल्हा हिरवागार फुललेला दिसतो... याच जिल्ह्यातील कोल्हापूर शहरला मात्र पाण्याच्या समस्येने ग्रासल आहे... काळम्मावाडी धरणामधून कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आणली... मात्र या योजनेचा अद्याप म्हणावा तितका फायदा कोल्हापूर शहराला होत नाही... 2010 ते 2015 या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ही योजना मंजूर झाली... मात्र प्रत्यक्षात पाणी कोल्हापूर शहरापर्यंत येण्यासाठी 2023 काळ उजाडला...मात्र त्यानंतर देखील शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही....
All Shows

































