एक्स्प्लोर

Shrirang Barne Ajit Pawar Special Report :मावळमध्ये प्रचाराबाबत श्रीरंग बारणे यांची कुणावर नाराजी?

Ajit Pawar Group on Shrirang Barne, Maval : लोकसभा निवडणूकीचा निकाल येण्यापूर्वीच एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत पराभव झाला तर त्याला भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) जबाबदार असतील असं म्हटलं होतं. आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडलय. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आमदारांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल हाती येण्यापूर्वीच महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात केली आहे. 

श्रीरंग बारणे काय म्हणाले होते? 

काही कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नाही. मी याची लिस्ट अजितदादांकडे दिली होती. निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. पण सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झालं असतं. महायुतीचे सहा विधानसभा मतदारसंघात आहेत, त्या सर्व मतदारसंघातील आमदारांनी माझं काम केलं आहे, असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं होतं. अजितदादांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आमदारांनी चांगल काम केलं. पण काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. 100 टक्के कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर संजोग वाघेरेंचे डिपॉझीट जप्त झाले असते. काही कारणास्तव खालचा कार्यकर्ता दुखावला होता. त्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांमुळे मतांवर काही मतांवर परिणाम होईल, असंही श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी स्पष्ट केलंय.

सुनील शेळकेंकडून जोरदार प्रत्युत्तर 

श्रीरंग बारणेंच्या (Shrirang Barne) आरोपांना उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे. तसे आदेश आम्हाला आमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला आदेश दिले होते. आम्ही काम देखील केलं आहे. पार्थ पवार स्वतः याठिकाणी थांबले होते आणि आम्ही प्रचार केला आहे. बारणे यांच्याकडून खापर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या विषयी मतदारांमध्ये नाराजी होती हे त्यांनी आता मान्य केलं पाहिजे, असं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे. 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget