Torres Scam Mumbai : मुंबईत भाजीवाल्याचे 14 कोटी बुडाले, टोरेसनं फसवलं Special Report
मुंबईत हिऱ्याचे दागिने विकणारी आणि त्यावर कमिशन देणारी टोरेस कंपनी. अवघ्या एका वर्षात या कंपनीनं मुंबईतल्या काही भागात आलिशान शोरुम्स उघडली. वेगवेगळी प्रलोभनं दाखवून गुंतवणूकदार आपल्या जाळ्यात ओढले. आणि हजारो कोटींचा चुना लावून एका रात्रीत सगळ्या शाखांचं शटर डाऊन केलं. आता गुंतवणूकदार गुंतवलेल्या पैशांसाठी धावपळ करताना पाहायला मिळतायत... त्यात एका भाजी विक्रेत्यानं तर तब्बल १४ कोटी यात गुंतवले होते... पाहूयात या प्रकरणाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
ऐकलात?
१४ कोटी... होय... १४ कोटी...
स्वत:चे ४-४.५ कोटी आणि नातेवाईंकांकडून घेतलेले
असे मिळून तब्बल १४ कोटी रुपये या भाजी व्यापाऱ्यानं टोरेसमध्ये गुंतवले...
दादरच्या भाजी मंडईतील ५० टक्के व्यापाऱ्यांनी
या टोरेस कंपनीत पैसे गुंतवले होते...
त्यापैकीच एक आहेत प्रदीपकुमार वैश्य
कंपनीचा झगमगाट... पार्ट्या... सेलिब्रेटींची येजा
हे सगळं पाहून प्रदीपकुमार यांनी गुंतवणूक केली...
सुरुवातीला भारी रिटर्न्स मिळाले...
आणि प्रदीपकुमार यांचा कंपनीवर विश्वास बसला...
अनेकांकडून पैसे घेतले आणि गुंतवले...
पण टोरेसनं एका रात्रीत आपला गाशा गुंडाळला
आणि गुंतवणूकदारांनी प्रदीपकुमार यांच्याकडे पैशांचा तगादा लावला....
गोरेगावच्या आस्मा सय्यद
यांनाही टोरेसनं गंडा घातलाय...
चेन मार्केटिंगप्रमाणे त्यांनी स्वत:सोबत आणखी अनेकांना टोरेसशी जोडलं
आणि एकूण ४० ते ५० लाखांचा चुना लागला
आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरु आहे...
कंपनीच्या दादर कार्यालयातून कोट्यावधीची रोकड,
भेट वस्तू, व्हाऊचर्स कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली आहेत...
कंपनीची बॅकेतील ३ खाती फ्रिज केली असून त्यात ११ कोटींची रोकड असल्याचंही तपासात समोर आलंय....
कंपनीच्या कार्यालयांबाहेर आजही शेकडो गुंतवणूकदारांची अशी गर्दी दिसतेय...
मुंबईसारख्या मोठ्या शहरात एक परदेशी कंपनी येते...
आपलं जाळं विणते... सर्वसामान्य ग्राहकांना भुलवते...
आणि करोडोंचा गंडा घालून एका वर्षाच्या आत क्षणात गायब होते....
ही बाब गंभीर आहे....