MVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special Report
विधानसभा निवडणुकीला सामोरं जातानाच महाविकास आघाडीतील बेबनाव स्पष्ट दिसत होता.. विधानसभेतील दारुण पराभवानंतर तो आता आणखीणच वाढताना दिसतोय.. आधीच तीन पक्षांच्या नेत्यांची तोंडं तीन दिशेला होती.. त्यात आता पराभवाचं खापर एकमेंकावर फोडणं सुुरु आहे.. मविआतील नेते जाहीरपणे एकमेकांच्या चुकांची मांडणी करताना किंवा मग एकमेकांवर चिखल फेक करताना दिसतायत.... महाविकास आघाडीमध्ये खरंच बिघाडी झाली आहे का? लवकरच एक होती मविआ असं म्हणायची वेळ येणार का ? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट
राज्यात महायुती सरकार येऊन महिना उलटून गेला.. महाविकास आघाडीतील खदखद समोर येऊ लागली आहे. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, आणि पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेते जाहीरपणे एकमेकांवर दोषारोप करत चुकांचं विश्लेषण करु लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार.. यांनी विधानसभेतील दारुण पराभवासाठी एक प्रकारे मित्रपक्षातील संजय राऊत आणि आपल्याच पक्षातील नाना पटोले यांना जबाबदार धरलंय.
यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. संजय राऊतांनी चूका झाल्या आहेत त्य़ा स्विकारल्या पाहिजे अशी संयत भूमिका सुरुवातीला घेतली. मात्र लगेच काँग्रेसवर खास आपल्या शैलीत टीकाही केली. काँग्रेसने जास्त जागाचा हट्ट केला, काँग्रेसच्या केंद्रीय समितीने हवं तसं लक्ष दिलं नाही असा आरोप राऊतांनी केला. विदर्भातील निकालासाठी तर राऊतांनी वडेट्टीवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.
महाविकास आघाडीतील समन्वय अभावामुळे शरद पवार नाराज असल्याचं बोललं जातंय.
त्यातच पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या अवस्थेचं वर्णन केलं..
२३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
महायुतीने २३७ जागा जिंकल्या, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.
या पराभवानंतर महाविकास आघाडी ना एकत्रित मोठ्या मंचावर दिसली, ना राज्यस्तरीय बैठका झाल्या... ना एकत्रित कुठली रणनीती दिसली.. ना विरोधीपक्ष म्हणून कोणता समन्वय दिसला..
त्यामुळे खरंच महाविकास आघाडी अस्तित्वात आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.