Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole
तिकडे मविआत अशी धुसफूस सुरु असताना मविआचा घटकपक्ष असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीतही वेगळंच नाट्य रंगलय. आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. जयंत पाटील यांच्यावर सध्या पक्षांतर्गत उद्रेकाला सामोरं जाण्याची वेळ आलीय. वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी थेट शरद पवारांसमोर लावून धरलीय. आता ही कार्यकर्त्यांची स्वतःची मागणी आहे की यामागे पक्षातीलच काही नेत्यांचं पाठबळ आहे, याचीही चर्चा रंगलीय. पाहूया, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट.
दोन महिन्यात दिवस कसे पालटतात, याचं हे उदाहरण.
विधानसभा निवडणुकांपूर्वी जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी टाकण्याची भाषा खुद्द शरद पवारांनी केली होती.
त्या जयंत पाटलांना आता मोठी जबाबदारी मिळणं सोडाच, आहे ती जबाबदारी कायम राहते का, याची चर्चा सुरु झालीय.
पक्षात तरुण नेतृत्वाला संधी मिळण्यासाठी भाकरी फिरवण्याची गरज असल्याचं पक्षाचे प्रवक्ते जाहीरपणे बोलू लागलेत.
ही मागणी केवळ माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर नाही, तर खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांसमोर करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं मंथन करण्यासाठी मुंबईत आयोजित बैठकीतच पवारांनी ज्येष्ठ नेत्यांपासून ते छोट्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वांची मतं जाणून घेतली.
जयंत पाटलांविरोधात असलेल्या पक्षांतर्गत नाराजीला प्रत्यक्ष वाचा फोडली विकास लवांडेंनी.
राजीनामा मागणाऱ्यांनी स्वतःच्या प्रभागात मिळालेल्या मतांचा हिशेब द्यावा, असं म्हणत जयंत पाटलांनी लवांडेंना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यानंतरही भाकरी फिरवण्याची ही चर्चा काही शमली नाही.
जयंत पाटलांसह सर्व महत्त्वाच्या पदावर भाकरी फिरवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली.
कार्यकर्त्यांच्या मागण्या
- मराठाव्यतिरिक्त समाजाच्या नेत्याला संधी द्यावी
- वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा
- सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बदलावेत