Soybean Kharedi : बारदामानामुळे अडून, सोयाबीन पडून; सोयाबीन पिकवलं पण विकायचं कुठे? Special Report
आता बळीराजाशी संबंधित अत्यंत महत्वाचा मुद्दा. बळीराजानं मोठ्या कष्टानं सोयाबीन पिकवलं पण ते कुठे विकायचे हा प्रश्न त्याला पडलाय, आणि याचे कारण आहे बारदाना. नाफेडने बारदानाअभावी ६ जानेवारीपासून सोयाबीन खरेदी थांबवल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. बारदाने लवकरच येतील आणि सोयाबीन खरेदी पुन्हा सुरु होईल का असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय.
शेतकऱ्यांपुढे बारदाना संपल्याची समस्या का उद्भवली?
सोयाबीन खरेदी आणि सरकारची अनास्था
२६ जिल्ह्यातील ३४१ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी
७,४४,७५७ शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणी
२,०६,९९० शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी
५,२६,०७ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी
३५ लाख १४ हजार क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून
७४ लाख नग बारदान्याची गरज
बारदानाचा पुरवठा कोलकाता येथून केला जातो.
मात्र ज्यूटच्या किमतीत वाढ झाल्याने बारदानाच्याही किमती वाढल्यात.
त्यामुळे जुन्या पुरवठादारांनी बारदाना पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवलीय.
मात्र लवकरच बारदाना उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे
दुसरीकडे सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी आणि व्यापारीही चिंतेत आहेत.
१४ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरु राहाणार आहे.
सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर करण्याच्या पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सूचना दिल्यात
महाराष्ट्र सरकारकडे बारदाना खरेदी करण्यासाठी पैसे नसणे ही अत्यंत दुर्देवाची आणि संतापजनक बाब आहे.
मुख्यमंत्री फडणवीस बळीराजाची हाक ऐकून बारदाना उपलब्ध करून देण्याचे काम करतील का?
एवढाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो.