Thackeray- CM Special Report : 'बाळासाहेबां'साठी शिंदे आणि Uddhav Thackeray एकाच मंचावर येणार?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जानेवारीला त्यांच्या तैलचित्राचं विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं रितसर निमंत्रण उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात एकमेकांविषयी कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेल्या साडेसहा महिन्यांमध्ये एका व्यासपीठावर किंवा विधानभवनातही एकत्र आलेले नाहीत. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्या व्यासपीठावर असण्याची चिन्हं आहेत.