Raj Thackeray Modi Oath : 'गरज सरो, वैद्य विसरो? शपथविधीच्या गैर हजेरीचं 'राज' काय? Special Report
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या खांद्याला खांदा लावून मनसेचे कार्यकर्तेही जोमाने मैदानात उतरले होते... मात्र केंद्रात भाजपचं सरकार स्थापन झालं आणि नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी शपथ घेतल्या... आणि याच सोहळ्यात राज ठाकरे शोधूनही दिसले नाहीत... त्यामुळे आता वेगळीच चर्चा रंगल्याचं दिसतंय... पाहूयात, याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...
भाजपचं 'गरज सरो, वैद्य विसरो?'
शपथविधीला गैरहजेरीचं 'राज' काय?
बिनशर्त पाठिंबा दिला... नुसता पाठिंबा दिला नाही तर महायुतीच्या काही उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा ही घेतली... मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आले आणि महायुतीला राज ठाकरेंचा विसर पडलाय.. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली... मोदींच्या या शपथविधी सोहळ्याला दिल्लीत जगभरातील दिग्गज मंडळी उपस्थित राहिले... विरोधी पक्षातील ही महत्त्वाचे नेते उपस्थित राहिले... मात्र ज्या राज ठाकरेंनी महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला तेच राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहिले नाही... राज ठाकरे नेमके या सोहळ्याला का उपस्थित राहिले नाहीत याचे कारण आता समोर आलेय... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिलं नसल्याने ते शपथविधीला गेले नसल्याचे माहिती आता मनसेच्या गोटातून मिळतेय... राज ठाकरेंना सन्मानपूर्वक निमंत्रण न दिल्याने मनसेमध्ये नाराजी पसरली...
All Shows

































