Pune Mumbai Highway Toll Special Report : मुंबई पुणे हायवेवर वाहनधारकांना बसणार टोल दरवाढीचा फटका
Pune Mumbai Highway Toll Special Report : मुंबई पुणे हायवेवर वाहनधारकांना बसणार टोल दरवाढीचा फटका
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास एक एप्रिलपासून आणखी महागणार आहे. एक्स्प्रेस वेनं प्रवास करताना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना 2004 साली काढण्यात आली होती. त्यानुसार 2023 मध्ये टोलच्या दरात वाढ होत आहे. नव्या दरानुसार चारचाकी वाहनांना २७० रुपयांऐवजी ३२० रुपये, टेम्पोसाठी ४२० रुपयांऐवजी ४९५ रुपये, ट्रकसाठी ५८० रुपयांऐवजी ६८५ रुपये आणि बससाठी ७९७ रुपयांऐवजी ९४० रुपये टोल आकारण्यात येईल. याआधी 1 एप्रिल 2020 रोजी टोलदरात अशीच वाढ झाली होती. आता 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे नव्या टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असं एमएसआरडीसी कडून सांगण्यात आलं आहे.