एक्स्प्लोर

Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

NCP Ajit Pawar & Sharad Pawar camp: शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फोनवरुन संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वाची घडामोड

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे. मात्र, अलीकडच्या काळात सार्वजनिक व्यासपीठांवर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकत्र बसणे किंवा बोलणे कटाक्षाने टाळले होते. नुकत्याच इंदापुरात झालेल्या कार्यक्रमातही अजित पवार हे स्टेजवर बसले होते. तर त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत प्रेक्षकांमध्ये बसणे पसंत केले होते. त्यामुळे पवार कुटुंबीयांमधील दुरावा संपला नसल्याचे बोलले जात होते. मात्र, अशातच आता अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अजितदादांनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचे सांगितले जाते.

काही दिवसांपूर्वी शरद पवार हे सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापुरातील कार्यक्रमादरम्यान भाषण करतानाच शरद पवारांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले होते. शरद पवार यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. शरद पवार यांना खोकला आणि कफचा त्रास होत आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शरद पवारांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कार्यक्रमापूर्वी काका-पुतण्याची चर्चा

काही दिवसांपूर्वी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये एक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या शेजारी बसणे टाळले होते. त्यासाठी ऐनवेळी व्यासपीठावरील आसनव्यवस्था बदण्यात आली होती. या गोष्टीचा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, या जाहीर कार्यक्रमापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. 

 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठकीसाठी पोहोचल्यानंतर अजित पवार यांनी  ‘साहेब (शरद पवार) कुठे बसले आहेत,’ अशी विचारणा केली आणि थेट ‘साहेब’ बसलेल्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यालयात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांसोबत बोलत होते. शरद पवार यांच्यासमवेत अजित पवार आणि वळसे पाटील हे 15 ते 20मिनिटे बंद खोलीत होते. त्या ठिकाणी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील दाखल झाल्यानंतर सर्व जण बैठकीसाठी गेले. ही बैठक सुरू होण्यापूर्वी काका-पुतणे यांच्यासह वळसे पाटील यांच्यात 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे पडद्यामागे काका आणि पुतण्यात चर्चा सुरु असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

शरद पवार गटाची मुंबईत महत्त्वाची बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार. सलग दोन दिवस या बैठकांचं सत्र हे पक्षाच्या कार्यालयात सुरू असेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवीआ मधे प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेने सोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे. या दोन दिवसीय बैठकीमध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा

शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget