Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : अंगलट आले की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी भाडेवाढ तत्काळ मागे घेतली पाहिजे, मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही असे सांगतिले जात आहे, तर मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ (Vijay Wadettiwar on ST Fair Hike) विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? या खात्याला कोणी वाली नाही का? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू असल्याचा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आले की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
तर एसटी भाडेवाढ तत्काळ मागे घ्यावी
विजय वडेट्टीवार म्हणाले की, एसटी भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध आहे, तर एसटी भाडेवाढ तत्काळ मागे घ्यावी,जनतेला दिलासा द्यावा. दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही, तर या परिवहन खात्याला वाली कोण? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवत असतील, तर हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे.
एसटीच्या तिकीट दरात 14.97 टक्के दरवाढ
दुसरीकडे, एसटीच्या तिकीट दरात 14.97 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लालपरीचा प्रवास महागणार आहे. एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही वाहनांच्या दरात 3 रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित 14.97 टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती आजपासून लागू होईल. तसंच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून तो निर्णय 1 फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली होती. भाडेवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांहून 26 रुपये इतके होणार असून टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांहून 31 रुपये इतके होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या