CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
आपला देश ज्या काही महापुरुषांच्या कायमस्वरुपी ऋणात आहे त्यातलं एक मोठं आणि महत्वाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा देदिप्यमान इतिहास, हिंदवी स्वराज्य स्थापन्यासाठी केलेला त्याग आणि संघर्ष येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहिल. मात्र अशा या रयतेच्या राजाबद्दल सीबीएसईच्या पुस्तकात फक्त ६८ शब्दांची माहिती देण्यात आलीय. आमदार सत्यजीत तांबे यांनी सहा महिन्यांपूर्वी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. आज हिवाळी अधिवेशनातही त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हा विषय गांभिर्याने घेईल? पाहुयात
आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही अशा शत्रूंशी एकाच वेळी लढणाऱ्या
इंग्रज, पोर्तुगिज, फ्रेंच,डच अशा विदेशी शक्तींना धाकात ठेवणाऱ्या
अफजल, शायस्ता, औरंग सारख्या निर्दयी, मग्रुर, धर्मांध शक्तींना जन्माची अद्दल घडवणाऱ्या
एक एक मावळा जोडून
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या
शेतकऱ्याची काळजी घेत
रयतेचं राज्य निर्माण करणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगताना शब्द अपुरे पडतात
पण आपल्या सीबीएसई अभ्यासक्रमात शिवरायांबद्दल किती माहिती असेल
तर फक्त ६८ शब्द
होय, फक्त ६८ शब्द
आमदार सत्यजीत तांबेंनी अधिवेशनात या मुद्द्याकडे लक्ष वेधलं
BITE- सत्यजीत तांबे
शिवरायांचा प्रेरणादायी, जाज्वल्य, आदर्श, दिशादर्शक इतिहास
सीबीएसई फक्त ६८ शब्दांमध्ये सांगत असेल तर सरकारने पेटून उठावं असं आवाहन सत्यजीत तांबेंनी केलं.
त्याला मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलं.
BITE- पंकज भोयर
दरम्यान ज्या अभ्यासक्रमाचा उल्लेख सत्यजीत तांबेंनी केला त्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला.
WKT आफ्ताब शेख
((R SOLAPUR AFTAB BOOK WKT 121225
Z:1212SOLAPURCBSE BOOK))
सीबीएसईच्या भोंगळ कारभारावर शिवप्रेमींनी चांगलाच संताप व्यक्त केला
BITES- पुणे चौपाल येणार आहे
VO CLOSE
शिवाजी महाराजांची कीर्ती साता समुद्रापार पोहोचली आहे. अशावेळी आपल्याच देशात फक्त ६८ शब्दांत त्यांची माहिती पुढच्या पिढीला सांगितली जात असेल तर यापेक्षा दुर्दैव ते कोणते.
महाराष्ट्र सरकार ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणून देईल आणि अभ्यासक्रमात योग्य तो बदल होईल अशी आशा
ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा
All Shows

































