Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
ज्या अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली
त्याच अंदमानात सावरकरांचा पुतळा विराजमान करण्यात आलाय. आज या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं... तर अनेक दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. पाहुयात सावरकरांच्या आठवणींना उजाळा देणारा एक रिपोर्ट...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...
आणि त्यांनी लिहिलेलं हे अजरामर गीत...
ने मजसी ने... परत मातृभूमीला...
सागरा प्राण तळमळला...
भारतमातेच्या विरहानं व्याकूळ झालेल्या एका देशभक्ताची
जणू गाथाच...
सावरकरांनी लिहिलेल्या या गीताला यंदा 115 हून अधिक वर्षे पूर्ण झालीत
आणि त्याच निमित्तानं अंदमानातल्या पोर्ट ब्लेअर इथे
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्याचं
अनावरण करण्यात आलं...
या विशेष सोहळ्यासाठी उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत... देशाचे गृहमंत्री अमित शहा... आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार...
शंखनादात या पुतळ्याचं अनावरण झालं...
सगळ्यांनी सावरकरांच्या चरणी गुलाबपुष्प अर्पण केलीय आणि
सावरकरांच्या जाज्वल्य देशाभिमानाचा इतिहास पुन्हा जीवंत झाला...
((बाईट - मोहन भागवत))
((बाईट - अमित शहा
अमित शाह - सावरकर जी का एक वाक्य बहुत महत्वपूर्ण है - वीरता भय का आभाव नहीं है, भय के उपर जीत है.. सावरकर जी इस वाक्य को जिया है..
अमित शाह - आनेवाले सदियों तक ऐसा व्यक्ति नहीं आएगा, वो writer भी थे, वो Fighter भी थे.. वो अच्छे कवि थे, अच्छे लेखक थे, वो दोनों में उत्कृष्ट थे
अमित शाह - आजादी के आंदोलन में जब सेलुलर जेल में आए, तो जेलर ने कहा कि आए तो हो, लेकिन वापस कैसे जाओगे, तो उन्होंने कहा कि मैं वापस जरूर जाउंगा))
व्हिओ - २
सावरकरांचा हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे.
तर या कार्यक्रमासाठी सावरकरांच्या असंख्य रचनांना संगीत देणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर आवर्जुन उपस्थित होते...
त्यांनीही सावरकरांच्या रचनांच्या आणि त्यांच्या सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला...
((बाईट - हृदयनाथ मंगेशकर - गाण्याविषयीचा बाईट, मी हे गाणं बदलून घेण्यासाठी गेलो होतो... इ.))
व्हिओ - ३
सावरकरांचे विचार आणि त्यांचं साहित्य याच्या प्रचारासाठी प्रसारासाठी कार्य करणाऱ्या अनेकांचा आज अंदमानात सत्कारही पार पड़ला.
ज्यामध्ये मंगेशकर कुटुंब, अभिनेते शरद पोंक्षे, सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदिप हुडा आणि लेखक विक्रम संपत यांना गौरवण्यात आलं...
((बाईट - ))
व्हिओ - ४
ज्या अंदमानातल्या तुरूंगात सावरकरांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा झाली...
त्याच ठिकाणी आज सावकरांचा पुतळा गौरवानं उभा राहिला...
भारतमातेच्या आठवणीत सावरकरांनी 1909 मध्ये लिहिलेलं गीत
आज अंदमानात पुन्हा गायलं गेलं आणि वातावरण भारावलं...
तुम्हालाही कधी अंदमानात जाण्याचा योग आला... तर जरूर या ठिकाणाला भेट द्या...
ब्य़ुरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































