एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal Ministry Special Report : फायटर छगन भुजबळ यांची समजूत अजितदादा कशी काढणार?

Chhagan Bhujbal Ministry Special Report : फायटर छगन भुजबळ यांची समजूत अजितदादा कशी काढणार?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजितदादा गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या छगन भुजबळ यांना नेहमीप्रमाणे मंत्रीपद मिळणार, याबद्दल अनेकांना खात्री होती. मात्र, रविवारी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 मंत्र्यांच्या यादीत  छगन भुजबळ यांचे नाव नसल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळाला धक्का बसला होता. छगन भुजबळ यांच्यासारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळातून बाहेर  कसे ठेवले गेले, असा प्रश्न कालपासून सर्वतोमुखी आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  भाजप आमदाराने छगन भुजबळ यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा केला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला नाही. त्यांना राज्यपाल केले जाणार आहे, असा दावा भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केला. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणत्याही आमदारांमध्ये  नाराजी नाही, असेही देशमुख यांनी म्हटले. देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. छगन भुजबळ यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकद अजूनही कायम आहे. ओबीसी नेता म्हणून त्यांचे राजकीय वजन मोठे आहे. अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे राज्यपाल पद स्वीकारण्यास राजी होतील का, हाच मोठा प्रश्न आहे. यावर आता छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.   मंत्रिपद  न मिळाल्यामुळे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. ते अधिवेशन सोडून कालच नाशिकमध्ये दाखल झाले होते. छगन भुजबळ मंगळवारी नाशिकच्या भुजबळ फार्म आणि येवला मतदार संघातील कार्यालयात कार्यकर्त्यांशी भेटून करणार संवाद साधणार आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळ समर्थक आणि ओबीसी संघटना काल रस्त्यावर उतरल्या होत्या. काही ठिकाणी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते. त्यामुळे आता छगन भुजबळ काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 08 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सGovt Order Issued to Give Classic Status to Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारीSanjay Raut Mumbai : हा निर्लज्जपणा.. फोडाफोडीची भूक भागत नाही, राऊतांची राष्ट्रवादीवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 08 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Embed widget