Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या हत्येला महिना पूर्ण, न्याय कधी मिळणार Special Report
एक महिना किती मोठा असतो याचं उत्तर पाहायचं असेल तर गेल्या महिनाभरात सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांचे सुकलेले चेहरे आणि आटलेले डोळे पाहा...
कोणतीही बरी वाईट घटना आपल्या फायद्यासाठी कशी वापरायची हे पाहायचं असेल तर गेल्या महिनाभरातली काही नेत्यांची भाषणं पाहा.
राजकारणाच्या कोलाहलात. आरोप-प्रत्यारोपांच्या गोंगाटात... आपण एवढंही हरवायला नको की
देशमुख कुटुंबानं काय गमावलंय याचा विसर पडेल.
त्या हत्येला आज महिना पूर्ण झाला. काय बदललं?...
खरंच काही बदललं का? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
ज्या घटनेनं महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालंय...
त्या संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झालाय..
मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येप्रकरणी सीआयडी, एसआयटीने ७ आरोपींना अटक केलीय तर १ आरोपी अजुनही फरार आहे.
खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड सुद्धा पोलिसांना शरण आलेत.
मात्र महिनाभरानंतरही सरपंच संतोष देशमुखांची हत्या, वाल्मिक कराडवरच्या कारवाईची आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे सुरू असलेलं राजकारण तसूभरही कमी झालेलं नाहीय
आतापर्यंत तोंडावर बोट ठेवून असलेल्या अजित पवारांनी महिनाभरानंतर मौन सोडलंय..
आणि विरोधकांना उत्तर दिलंय