एक्स्प्लोर

YouTube वरुन पैसे कमावणं झालं सोपं; आता 1000 नाहीतर तर फक्त इतकेच हवे सबस्क्राइबर्स

Youtube Monetization New Update: व्हीडिओ क्रिएटर्सना आता युट्युबवरून पैसे कमावणं सोपं होणार आहे. युट्युबने Monetization साठीच्या निकषात बदल केले आहेत.

Youtube Monetization:  युट्युब कंटेट क्रिएटर्सची मोठी बातमी समोर आली आहे. युट्युबवर  (YouTube) तुमचे जर चॅनल असेल तर तुम्हाला कमाईसाठी मोनेटाइजेशनची (Monetization) फारशी चिंता करण्याचे कारण नाही. आता, तुमच्या युट्युब चॅनलला फक्त 500 सब्सक्रायबर्स असतील तरी तुम्हाला पैसै मिळू शकतात. याआधी ही मर्यादा 1000 सब्सक्राइबर्सची होती. 

युट्युबने आज याबाबतची माहिती दिली आहे. युट्युबने  म्हटले की, YouTube भागीदार कार्यक्रमासाठी पात्रता निकष अधित सुलभ करत आहे. कमी फॉलोअर्स असलेल्या कंटेट क्रिएटर्ससाठी (youtube content creator) मोनेटाइजेशन प्रोसेस आणखी सोपी करत असल्याचे त्यांनी म्हटले. म्हणजेच, आता कमी फॉलोअर्स असलेले क्रिएटर्स देखील त्यांच्या YouTube चॅनेलच्या मार्फत कमाई करू शकतील

YouTube ने केले नियमात बदल 

याआधी कंटेट क्रिएटर्सना YouTube भागीदार कार्यक्रमात सामील होण्यासाठी अनेक निकषांची पूर्तता करावी लागत होती.  परंतु आता नवीन नियमानुसार, क्रिएटर्सना पात्र होण्यासाठी फक्त 500 सब्सक्राइबर्सची आवश्यकता आहे. आधीच्या निकषाच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. त्याच वेळी, YouTube ने वॉच हवर 4000 तासांहून 3000 तासांवर आणले आहेत.  म्हणजेच आता वर्षभरात केवळ 3000 वॉच हवर पूर्ण करायचे आहेत.

तसेच Youtube Shorts व्ह्यूज 10 दशलक्षावरून 3 दशलक्षापर्यंत कमी झाले आहेत. म्हणजेच, क्रिएटर्सकडून चॅनेलची कमाई करण्यासाठी, 90 दिवसांत 30 लाख Youtube Shorts व्ह्यूज असणे आवश्यक आहे. हे नियम प्रथम अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये लागू केले जातील. यानंतर ते इतर देशांमध्येही लागू केले जाऊ शकतात. 

छोट्या व्हीडिओ क्रिएटर्सला फायदा

युट्यूबच्या या नव्या नियमाचा फायदा छोट्या व्हीडिओ क्रिएटर्सला होणार आहे. या लहान व्हीडिओ क्रिएटर्सला आपला कंटेट युट्युबवर मोनेटाइजेशन करण्याची संधी मिळणार आहे.

तथापि, त्यांचे प्रेक्षक वाढवण्यासाठी आणि जाहिरातींचा महसूल मिळविण्यासाठी त्यांना काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. महसूल हिस्सा वाटपाचे सूत्र कायम आहे. जे क्रिएटर्स आधीपासूनच Youtube पार्टनर प्रोग्राममध्ये आहेत. त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. Youtube पार्टनर प्रोग्राममध्ये असलेल्या क्रिएटर्सना सुपर थँक्स, सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स आदी सारखे उपयोगी टूल्स वापरता येतील. 

YouTube वरून पैसे कमावण्यासाठीचे एक्स्ट्रा टीप्स

YouTube वर व्हिडीओ बनवल्यानंतर लगेच अर्निंगला सुरूवात होत नाही. त्यासाठी काही महिने वाट पाहावी लागते. पैसे कमावण्यासाठी वेळ आणि प्रचंड परिश्रम लागतात. तसेच, कामात सातत्य राखण्यासाठी संयमाची कसोटी लागते. यानंतर तुम्ही YouTube व्हिडोओ बनवून YouTube प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवायला सुरूवात करू शकता.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget