(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Whatsapp New Update : Whatsapp चं नवीन फिचर लवकरच; आता एकाच फोनमध्ये अनेक अकाउंट ओपन करता येणार
कंपनीने आता यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप यूजर्सना एकाच डिव्हाईसवर WhatsApp चे अनेक अकाउंट उघडता येणार आहेत.
WhatsApp New Multi-Account Feature : लोकप्रिय मेसेजिंग शेअरिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच अपडेटेड फिचर्स घेऊन येतं. आतादेखील व्हॉट्सअॅपने असं एक नवीन फिचर लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आता यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप यूजर्सना एकाच डिव्हाईसवर WhatsApp चे अनेक अकाउंट उघडता येणार आहेत. आतापर्यंत यूजर्सना एका डिव्हाईसवर एकच अकाउंट उघडता येत होते. एकापेक्षा जास्त अकाउंट उघडायचे असल्यास यूजर्सना थर्ड पार्टी अॅप्स किंवा क्लोन व्हाट्सअॅप वापरावे लागत होते. मात्र आता ही कटकट बंद होणार आहे. हे फिचर वापरकर्त्यांना डिव्हाइसवर थेट WhatsApp सेटिंग्जमधून अकाउंट उघडण्याची परवानगी देईल. सोबतच तुम्हाला एकाच डिव्हाईसवरून तुमचे अकाउंट स्विच करता येणार आहे.
काय आहेत या फिचरचे फायदे?
या फिचरद्वारे तुमची प्रायव्हसी नियंत्रणात राहू शकते. जे लोक एकपेक्षा जास्त अकाउंट वापरतात त्या लोकांकरता हे फिचर उपयुक्त ठरणार आहे.
आता यूजर्स नाव न टाकताही व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करू शकणार
लवकरच यूजर्सना व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स नाव न टाकताही मित्रांबरोबर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करू शकतील. म्हणजेच ग्रुपच्या नावाची गरज भासणार नाही. सध्या व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करण्यासाठी यूजर्सना ग्रुपला नाव देणे आवश्यक आहे. तर फोटो आणि ग्रुपचे डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे. लवकरच यूजर्सना ग्रूपला नाव देण्याचे स्वातंत्र्यही मिळणार आहे. त्यामुळे यूजर्स कोणत्याही नावाशिवाय व्हॉट्सअॅप ग्रूप अगदी सहज तयार करू शकतील.
फक्त इतके यूजर्स अॅड होऊ शकतील
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये नावाशिवाय फक्त 6 लोकांनाच अॅड करता येणार आहे. जर 6 पेक्षा जास्त लोकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला असेल तर तुम्हाला त्या ग्रुपला नाव द्यावे लागेल. याव्यतिरिक्त, नावाशिवाय ग्रूपमधील प्रत्येक सदस्याच्या फोनवर ग्रुपचे नाव वेगळ्या पद्धतीने दिसेल. म्हणजेच ज्या नावाने ग्रुप मेंबरने लोकांचे कॉन्टॅक्ट सेव्ह केले असेल, त्या ग्रुपचे नाव प्रत्येकाच्या फोनमध्ये दिसेल. उदाहरणार्थ जर कोणी X आणि Y सेव्ह केले असेल आणि कोणी P आणि Z सेव्ह केले असेल, तर दोन्ही फोनमध्ये ग्रुपचे नाव वेगळे असेल. ग्रुपचं नाव पहिल्या यूजर्ससाठी XY आणि दुसऱ्यासाठी PZ असू शकते. व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे की, ते पुढील काही आठवड्यांत अँड्रॉइड, iOS आणि वेबवर जागतिक स्तरावर आपल्या यूजर्ससाठी हे फीचर आणणार आहे.
इतर महत्वाची बातमी