GPay, PhonePe किंवा Paytm वापरत असाल तर हे काम आताच करा, प्रायव्हसी होईल आणखी सुरक्षित!
Screenlock in UPI Apps: आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एखादे तरी UPI App डाऊनलोड केलेलं असतं. या अॅपमध्ये युजर्सला सिक्युरिटी फिचरचा पर्याय दिला जातो. याच्या वापरामुळे तुमचा डेटा चोरीला जात नाही.
Screenlock in UPI Apps : आजकाल कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी GPay, PhonePe किंवा Paytm सारख्या अॅप्सचा वापर केला जातो. बहुतांश व्यक्ती किराणा दुकान, हॉटेल्स, मॉल्स, पेट्रोल इत्यादी ठिकाणी यूपीआय अॅप्सचा (UPI Apps) वापर करतात. हे सर्व अॅप्स युजरफ्रेंडली असल्यामुळे जास्तीत लोक यूपीआय अॅप्सकडे वळत आहेत. यामुळे युजर्सना चांगली सेवा मिळत असली तरी ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो. सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. हे फ्रॉडर्स युजर्सचा डेटा चोरी करुन त्याची बाजारात विक्री करतात किंवा या डेटाचा गैरवापरही केला जातो. यामुळे यूपीआय अॅप्सचा वापर करताना खबरदारी घ्यायला हवी. आपला यूपीआय पासवर्ड कुणालाही शेअर करु नका. सर्वात सुरक्षित फिंगरप्रिट पासवर्डचा वापर करायला सुरुवात करा. या यूपीआय अॅप्समधील पासवर्ड फीचरचा जरुर वापर करा. यामुळे तुमचा डेटा चोरी होत नाही. यासाठी बायोमेट्रिक किंवा फिंगरप्रिंट पासवर्डचा वापर करा. याचं कारण दुसरी कोणतीही व्यक्ती तुमचं यूपीआय अॅप ओपन करु शकत नाही.
गुगल पे (Gpay) मध्ये असा करा 'पासर्वड ऑन'
1. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे अॅप डाऊनलोड केलेलं आहे, असं आपण गृहित धरु. या अॅपमध्ये फिंगरप्रिंट पासर्वडचा पर्याय ऑन करा. यासाठी तुम्हाला सर्व प्रथम अॅप्सच्या सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी आणि सिक्युरिटीच्या पर्यायवर क्लिक करावा लागेल.
2. जर तुम्ही आधीच पासर्वड सेट केलेला असेल, तर तुम्हाला पासर्वड टाकावा लागेल. नवीन युजर्सना पासवर्ड सेट करावा लागणार आहे.
3. आता तु्म्ही युज फिंगरप्रिंट अॅपलॉक हा पर्याय निवड करा आणि त्याला ऑन करा.
4. यामुळे पुढील वेळेस अॅप ओपन करताना तुम्हाला फिंगरप्रिंट पासर्वडचा वापर करता येईल.
फोन पे (Phonepe) मध्ये असा सेट करा फिंगरप्रिंट पासवर्ड
सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे अॅप ओपन करा. यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट अॅपलॉक ऑन करावं लागेल. यासाठी तुम्हाला सिक्युरिटीमध्ये जाऊन स्क्रीनलॉकची निवड करावी लागेल. यानंतर फिंगरप्रिंट पासवर्ड सेट करा आणि तो ऑन करुन ठेवा.
पेटीएम (Paytm) आणि पासर्वड फीचर
तुम्हाला Paytm अॅपच्या सिक्युरिटी ऑप्शनमध्ये जाऊन फिंगरप्रिंट लॉकचा पर्याय एनेबल करा. यामुळे तुमच्या यूपीआय अॅप्समधील डेटा चोरीला जाऊ शकत नाही. तुम्ही आधीपासून सिक्युरिटी फीचरचा वापर करत असाल, तर आपल्या आसपासच्या लोकांना जागरुक करा. यामुळे ते ऑनलाईन फसवणुकीला बळी पडणार नाहीत.
वाचा इतर बातम्या :
Online Payment Fraud: सावधान! 'या' ॲपवर अशी होतेय फसवणूक, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी