WhatsApp Update : लवकरच Whatsapp वर 'इन्स्टंट व्हिडीओ मेसेज'साठी मिळणार खास ऑप्शन; 'असं' करता येईल ऑन-ऑफ
WhatsApp Instant video messages feature : झटपट व्हिडीओ मेसेज फीचर्ससह, व्हॉट्सअॅप यूजर्स आपल्या चॅटमध्ये लहान व्हिडीओ मेसेज पाठवू आणि रिसिव्ह करू शकतील.
WhatsApp Instant video messages feature : लोकप्रिय मॅसेजिंग शेअरिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच अपडेटेड फिचर्स घेऊन येतं. आतादेखील Meta ने व्हॉट्सअॅपचे एक नवीन फिचर लाँच केले आहे. व्हॉट्सअॅपने यूजर्ससाठी इन्स्टंट व्हिडिओ मेसेज फीचर (WhatsApp Instant video messages feature) आणले आहे. नवीन झटपट व्हिडीओ मेसेज वैशिष्ट्यांसह, व्हॉट्सअॅप यूजर्स आपल्या चॅटमध्ये लहान व्हिडीओ मेसेज पाठवू आणि रिसिव्ह करू शकतील. या नवीन फीचरमुळे यूजरचा मेसेजिंग अनुभव अधिक चांगला होण्याची अपेक्षा आहे.
इन्स्टंट व्हिडीओ मेसेज व्हॉट्सअॅपमध्ये (WhatsApp Instant video messages) आधीपासून असलेल्या व्हॉईस मेसेज फीचरसारखाच आहे. याशिवाय, नवीन व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करण्याची पद्धत देखील व्हॉईस मेसेजसारखीच (Voice Message) आहे.
'अशा' प्रकारे 'हे' फीचर दिसेल
Instant video messages फीचर कसे वापराल?
- हे नवीन फीचर वापरण्यासाठी यूजर्सना सर्वात आधी एका चॅटमध्ये जावं लागेल.
- यानंतर, टेक्स्ट फील्डजवळ दिसणार्या व्हॉईस आयकॉनवर टॅप केल्याने कॅमेरा आयकॉन समोर येईल.
- यानंतर व्हॉईस मेसेजप्रमाणे व्हिडीओ रेकॉर्ड करता येईल.
- यूजर्स आपल्या संपर्कांसह 60 सेकंदांपर्यंतचे झटपट व्हिडीओ रेकॉर्ड आणि शेअर करू शकतात.
- यूजर्स रेकॉर्डिंग करताना स्वाईप अप करून लॉक करू शकतात आणि नंतर व्हिडीओ हँड्स-फ्री मोडमध्ये रेकॉर्ड करता येईल.
'असं' ऑन-ऑफ करता येईल
नवीन झटपट व्हिडीओ मेसेज नेहमीच्या व्हिडीओंपेक्षा वेगळे दाखविण्याच्या उद्देशाने चॅटमध्ये गोलाकार स्वरूपात दिसत आहेत. हे व्हिडीओ ऑटोमॅटिक म्यूट केले जाऊ शकतात. पण, यूजर्स म्यूट बटणावर टॅप करून आवाज ऐकू शकतात. हे वैशिष्ट्य एंड-टू-एंड एनक्रिप्शनला सपोर्ट करते. म्हणजेच, WhatsApp मेसेज सुरक्षित आणि खाजगी राहतील.
मेटाच्या म्हणण्यानुसार, झटपट व्हिडीओ मेसेज (Video Message) मजेदार असतात. आणि यूजर्स त्यांचे अविस्मरणीय क्षण आपल्या मित्र आणि कुटुंबीयांबरोबर सहजपणे सेव्ह करू शकतात. एखाद्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes) द्यायच्या असतील, किंवा एखाद्या विनोदावर (Jokes) हसायचं असेल किंवा चांगली माहिती झटपट द्यायची असेल तर हे फीचर उपयोगी पडेल.
लवकरच यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध
मेटाने दिलेल्या माहितीनुसार, या फीचरचे रोलआउट सुरू झाले आहे. आणि येत्या काही आठवड्यात हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Google चे सीईओ सुंदर पिचाईंनी दिला आठवणींना उजाळा; सांगितला वडिलांसोबतच्या पहिल्या ईमेलचा किस्सा