WhatsApp Security Tips : 'या' तीन प्रकारे सुरक्षित करा तुमचं Whatsapp अकाऊंट, नाहीतर पर्सनल डेटा गेलाच म्हणून समजा!
व्हाट्सॲप नव-नवीन सिक्युरिटी फिचर्सवर काम करत आहे. हे सिक्युरिटी फिचर्स लागू जरी केले तरी बऱ्याच लोकांना याबद्दल काहीही माहिती नसते. आपलं व्हॉट्सअप कसं सुरक्षित ठेवाल? पाहुयात...
WhatsApp Security Tips : जर तुम्ही व्हॉट्सॲपचे जुने व्हर्जन वापरत(WhatsApp Security Tips) असाल तर तुमचे व्हाट्सॲप हॅक (Whatsapp) होण्याची शक्यता (cyber security) वाढली आहे. अगदी दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आता त्याच्या सिक्युरिटीची काहीच गॅरंटी राहिली नाही आहे. म्हणूनच तुमचं व्हाट्सॲप तुम्ही वेळोवेळी अपडेट करणं खुप गरजेचं आहे. व्हाट्सॲप स्कॅम करण्यामध्ये आपला देश वेगाने पुढे जात आहे आणि यामुळे सावधानता बाळगणे खूप गरजेचा विषय बनला आहे. याच कारणामुळे व्हाट्सॲप नव-नवीन सिक्युरिटी फिचर्सवर काम करत आहे. हे सिक्युरिटी फिचर्स लागू जरी केले तरी बऱ्याच लोकांना याबद्दल काहीही माहिती नसते. आपलं व्हॉट्सअप कसं सुरक्षित ठेवाल? पाहुयात...
1) तुमचा 6 डिजिट वेरिफिकेशन कोड कोणालाही शेअर करू नका.
व्हाट्सॲप मध्ये एक 6 डिजिट सिक्युरिटी कोड असतो. जो कोड तुम्हाला ऑन करावा लागेल. या फिचरचे वैशिष्ट्य म्हणजे हा कोड जेव्हा तुम्ही ऑन कराल त्याच्यानंतर भविष्यात कधी पण तुम्ही त्या अकाऊंटमधून लॉगिन करणार असाल तर तो कोड तुमच्याकडे मागण्यात येईल. हा कोड तुम्हाला मॅसेज आणि कॉल यांच्यामार्फत मिळू शकतो . या कोडच्या मदतीने कोणत्या पण व्हाट्सॲप अकाउंट मध्ये कधीही लॉगिन केलं जाऊ शकतं.
२) अकाउंट एक्सेस अचानक बंद पडणे
जर तुमच्या व्हाट्सॲप अकाउंटचा एक्सेस अचानक बंद पडत असेल किंवा तुम्ही सारखं लॉग आउट होत असा तर तुम्हाला अलर्ट राहण्याची खूप जास्त गरज आहे आणि जर असं होत असेल तर तुम्ही लगेच तुमच्या अकाउंट लॉगआउट करुन पुन्हा लॉगईन करा. याव्यतिरिक्त जर तुमचा अकाउंट कोणत्याही लॅपटॉपमध्ये लॉगिन असेल तर तिथे सुद्धा चेक करा. या लिंग डिवाइसमध्ये कोणकोणत्या डिवाइसची नावे येत आहेत, तेदेखील पाहा.
3) ॲप कायम ठेवा अपडेट
जर तुम्ही व्हाट्सॲपचे जुने व्हर्जन वापरत असाल तर तुमचे व्हाट्सॲप हॅक होण्याची संभाव्यता सगळ्यात जास्त आहे. अर्थात त्याच्या सिक्युरिटीची काहीही गॅरेंटी नाही. या कारणामुळे तुम्हाला तुमचा व्हाट्सॲप ॲप तुमच्या फोनमध्ये कायम अपडेट ठेवावे लागेल. सध्या सगळीकडे अनेक प्रकारचे फ्रॉड सुरु आहे. त्यामुळे आपण आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Whatsapp Colour Change : व्हाट्सॲपचं भन्नाट फिचर, आता बदलू शकतात ॲपचा कलर!