एक्स्प्लोर

Google Valentine's Day 2023: प्रेमाच्या रंगात रंगलं 'गूगल डूडल'; काय आहे खास? जाणून घ्या

आज  'व्हॅलेंटाईन-डे' (Valentines day) निमित्त गूगलनं खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे.

Google Valentine's Day 2023: वर्षातील प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो, असं म्हणलं जातं. पण 14 फेब्रुवारी हा वर्षातील असा दिवस आहे, ज्या दिवशी आपल्या पार्टनरसमोर आपण प्रेम व्यक्त करु शकतो. 14 फेब्रुवारी हा  दिवस 'व्हॅलेंटाईन-डे' (Valentines day Celebration) म्हणून साजरा केला जातो. आज  'व्हॅलेंटाईन-डे' (Valentines day) निमित्त गूगलनं खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलचं डिझाईन खास आहे. गूगलच्या या डूडलमध्ये काय खास आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या प्रेमाच्या रंगात रंगलेल्या 'गूगल डूडल' बाबत...

गूगलच्या एनिमेटेड डूडलच्यामागे ब्लर इमेजमध्ये 'गूगल' असं लिहिलेलं दिसत आहे. या इमेजवर अनेक पाण्याचे थेंब दिसत आहेत. जर तुम्ही या डूडलवर क्लिक केलं तर तुम्हाला डूडलवरील एक थेंब खाली पडताना दिसेल. या पाण्याच्या थेंबामध्ये आणखी एक थेंब मिक्स होतो आणि एक हार्ट इमोजी तयार होतो. जर तुम्ही गूगल डूडलवर पुन्हा क्लिक केलं, तर या डूडलची माहिती तुम्हाला मिळाले. त्यामध्ये, 'रेनी डे सनशाइन व्हिल यू बी माइन' असं लिहिलेलं दिसत आहे. 

14 फेब्रुवारी आहे खास

गूगलच्या या 'व्हॅलेंटाईन-डे' स्पेशल डूडलबद्दल दिलेल्या माहितीमध्ये लिहिलं आहे, 'आजचा व्हॅलेंटाईन डे हा दिवस वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोक या दिवशी भेटवस्तू, शुभेच्छा यांच्याद्वारे आपल्या पार्टनरबद्दल आपुलकी व्यक्त करतात. मध्ययुगात 14 फेब्रुवारी दिवशी पक्ष्यांच्या संभोगाच्या हंगामाची सुरुवात होते, असं इंग्लंड आणि फ्रान्ससारख्या युरोपीय देशांमधील लोक मानत होते. आम्ही आशा करतो की तुम्ही तुमच्या खास व्यक्तीसोबत हा दिवस साजरा कराल.'

'व्हॅलेंटाईन डे' हा दिवस प्रेमात असलेल्या जोडप्यांसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. केवळ अविवाहित जोडपेच नाही, तर विवाहित लोकांमध्येही व्हॅलेंटाईन डे बद्दल खूप उत्साह असतो. 

सर्च इंजिन गूगल हे वेगवेगळे डूडल तयार करत असतात. न्यू इअर, प्रजासत्ताक दिन अशा खास दिवसांसाठी गूगल हे त्यांचे खास डूडल तयार करतात.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Sahir Ludhianvi Amrita Pritam : एक मुलाकात ते सिगारेट; साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची 'अधुरी प्रेम काहाणी'...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget