एक्स्प्लोर

Tweet Deck : ट्विटरचा मोठा निर्णय! आता TweetDeck वापरण्याकरता मोजावे लागणार पैसे

एलोन मस्कने जुलैमध्ये घोषणा केली होती की लवकरच ट्विट डेकची सेवा सशुल्क सेवेत रूपांतरित होणार आहे. आता हे अपडेट लागू केले गेले आहे

मुंबई : ट्विटर कायमच त्यांच्या सर्विसेसमध्ये अपडेट करत असते. कंपनी यूजर्सकरता नेहमी नवीन सर्विस देण्याच्या प्रयत्नात असते. अशात नुकतेच ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला होता तो म्हणजे त्यांनी लोगो बदलला होता. इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलून ब्लू बर्डच्या जागी "X" असा लोगो केला.

मात्र आता पुन्हा एकदा कंपनीने मोठा बदल केला आहे. तर हा बदल करण्यात आला आहे TweetDeck मध्ये. तुम्ही जर TweetDeck वापरत असाल तर आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. Twitter ने TweetDeck चे नाव बदलून X Pro केले आहे. तुम्हाला हे फिचर वापरण्याकरता दर वर्षाला 6,800 रुपये द्यावे लागणार आहेत. 

काय आहे TweetDeck?

हे एक अॅप्लिकेशन आहे ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक खाती ऑपरेट करु शकता. तसेच इतर लोकांच्या अकाऊंटवर लक्ष ठेवू शकता. आतापर्यंत ही सेवा मोफत देण्यात येत होती. मात्र या फीचरसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही X Pro सेवेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के सूट मिळू शकते. 

'या' सेवा होणार उपलब्ध!

लवकरच तुम्हाला X मध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सुविधा मिळेल. यामुळे अॅपवरील चॅटिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल. एलॉन मस्क यांनाला ट्विटर (आता X) चीनच्या WeChat सारखे बनवायचे आहे. 

X मधून पैसे कमवू शकता

आता तुम्ही youtube सारखे X Pro वरुन पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. तुमच्या खात्यावर 500 फॉलोअर्स असायला हवे.

ट्विटरने ही कंपनी 2011 मध्ये विकत घेतली 

लंडनस्थित TweetDeck कंपनी ट्विटरने 2011 साली विकत घेतली होती. यासाठी ट्विटरला 40 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 332 कोटी रुपये मोजावे लागले होते. ट्विटरच्या TweetDeck सेवेद्वारे, वापरकर्ते त्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या ट्विटर हँडलचे ट्वीट एकाच वेळी पाहू शकतात. 
 
तर काही दिवसांपू्र्वी ट्विटरचे लोकप्रिय ट्वीट (Tweet) बटण आता पोस्ट (Post) केले गेले. त्याच वेळी, यूजर्स आता रिट्वीटच्या (Retweet) जागी (Repost) हा पर्याय वापरु शकणार होते. एक्स न्यूज डेलीनुसार, नवा बदल नुकताच Android साठी बीटा व्हर्जनमध्ये करण्यात आला आहे. एलॉन मस्क यांनी नुकताच हा बदल ट्विटरवर केला होता. त्यामुळे या बदलानुसार आता ट्विटरचा वापर करणाऱ्या यूजर्सना Retweet च्या जागी Repost हे बटण दिसते. सध्या हा नवीन बदल Android साठी बीटा व्हर्जनमध्ये करण्यात आला आहे.  
 
इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSupriya Sule on Sunil tingre : पोर्श प्रकरणात बदनामी झाली तर कोर्टात खेचेन; शरद पवारांना नोटीस- सुळेABP Majha Headlines :  7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Embed widget