एक्स्प्लोर

Apple : USB-C चार्जिंग पोर्टसह iPhone 14 पुन्हा लॉन्च होणार, काय आहे कारण?

Iphone 14 हा Type-C पोर्ट सह लाँच केला जाऊ शकतो. यूएसबी सी सह iPhone 14 मॉडेल्स पुन्हा लाँच केल्याने कंपनीला बाजारात तिची उपलब्धता वाढवण्यात मदत होऊ शकणार आहे.

Iphone 14 : आयफोन कायमच ट्रेंडमध्ये असतो. या फोनमध्ये असणाऱ्या भन्नाट फीचर्समुळे हा फोन मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीस पडतो. आता पुन्हा एकादा कंपनी ग्राहकांकरता भन्नाट फिचर घेऊन आले आहे. लवकरच कंपनी iPhone 15 सीरिज USB C पोर्ट सह लाँच करणार आहे. Apple चा Iphone 15 पुढच्या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. सोबतच कंपनी जुन्या iPhone मॉडेल्समध्ये देखील USB C पोर्ट देऊ शकते. आयफोन 14 सीरिजचे काही मॉडेल्स टाईप-सी पोर्टसह पुन्हा लाँच केले जातील. tvOS 17 चा बीटा कोड लीक झाल्यामुळे ही माहिती मिळाली आहे.

लीक झालेल्या कोडनुसार, आयफोन 15 मालिकेसह एकूण सहा आयफोन मॉडेल टाईप-सी चार्जिंग पोर्टसह लॉन्च केले जाणार आहेत. यापूर्वी Apple ने iPad Pro मध्ये Type-C पोर्ट दिले होते. सध्या, आयफोन आणि इतर Apple उपकरणे लाइटनिंग पोर्टसह येतात. युरोपियन युनियनने सर्व कंपन्यांना 2024 पर्यंत त्यांची उपकरणे टाईप-सी पोर्टसह लॉन्च करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा Iphone 14 हा Type-C पोर्ट सह लाँच केला जाऊ शकतो. यूएसबी सी सह iPhone 14 मॉडेल्स पुन्हा लाँच केल्याने कंपनीला बाजारात तिची उपलब्धता वाढवण्यात मदत होऊ शकते. 

iPhone 15 चे भन्नाट फिचर

iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. गेल्या वर्षीपर्यंत ते प्रो मॉडेलपुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसरसह ऑफर केला जाऊ शकतो. असेही सांगितले जाते की या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल इमेज सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यात सॉफ्टवेअर अपग्रेडही दिले जाऊ शकते. iPhone 15 वरुन चांगल्या बॅटरी बॅकअपची अपेक्षा करु शकतो. या फोनमध्ये नवीन iOS सॉफ्टवेअर अपडेट दिले जाऊ शकते.

आयफोन 15 सीरिजमधील मॉडेलची अपेक्षित किंमत

आयफोन 15 (अंदाजे 65,700 रुपये) या किंमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर आयफोन 15 प्लसची सुरुवातीची किंमत  (अंदाजे 73,900), आयफोन 15 प्रो ची किंमत (अंदाजे 90,100) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि iPhone 15 Pro Max ची किंमत (अंदाजे 1,06,500 रुपये ) असण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Apple iPhone 15 : आता आयफोन 'मेड इन इंडिया', भारतात iPhone 15 चं उत्पादन सुरु; 'या' कंपनीसोबत करार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget