एक्स्प्लोर

Fake News Busting : सरकारने बनावट बातम्या पसरवणाऱ्या 8 यूट्युब चॅनेल्सवर घातली बंदी; यापैकी तुमच्या आवडतं चॅनेल तर नाही? वाचा सविस्तर

Fake News Busting : फेक न्यूज ही देशातील एक समस्या आहे आणि सरकार त्यावर उपाय करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलत आहे.

Fake News Busting : फेक न्यूजबाबत सरकार अत्यंत सतर्क झाले आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या हालचालींवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच, देशातील तरुण, विद्यार्थी आणि समाजावर परिणाम करणारे काही दिसले तर त्यावर कडक कारवाई केली जात आहे. या संदर्भात, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी (8 ऑगस्ट 2023) सांगितले की त्यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करत 8 यू ट्यूब (YouTube) चॅनेल्स बंद केले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे चॅनेल्स कोणत्याही तथ्याशिवाय लोकसभा निवडणुका वेळेपूर्वी जाहीर करण्याचे आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत होते.

सरकारने 'हे' यूट्यूब चॅनेल्स बंद केले

Dekho, Capital TV, KPS News, Government Vlog, Earn Tech India, SPN9 News, Educational Dost आणि World Best News. या यूट्यूब चॅनेल्सवर पडलेल्या व्हिडीओंची छाननी करण्यात आली ज्यामध्ये त्या चॅनेल खोट्या बातम्या पसरवत असल्याचे आढळून आले. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या चॅनेलची सत्यता तपासली आहे.

हे 'शिक्षणमित्र' सरकारी योजनांची चुकीची माहिती पसरवत होते

अधिकाऱ्यांनी सांगितले की, world best news या नावाचं एक यूट्यूब चॅनेल आहे. ज्याचे 17 लाखांहून अधिक सदस्य आहेत आणि 18 कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. हे चॅनेल भारतीय सैन्याचे चुकीचे वर्णन करत असल्याचे आढळले. ते म्हणाले की, एज्युकेशनल दोस्त या चॅनेलचे 30 लाखांहून अधिक सदस्य आहेत आणि 23 कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. चॅनल सरकारी योजनांबद्दल चुकीची माहिती पसरवत होते, तर 40 लाखांहून अधिक सदस्य आणि 189 कोटी व्ह्यूज असलेले SPN9 न्यूज राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित खोट्या बातम्या पसरवत होते. 

हे चॅनल पेट्रोलच्या उपलब्धतेबाबत खोट्या बातम्या पसरवत होते

45 लाखांहून अधिक व्ह्यूज असलेले सरकारी व्लॉग चॅनल सरकारी योजनांबद्दल खोट्या बातम्या पसरवत असल्याचे आढळून आले. तसेच, ते म्हणाले की, 10 लाखांहून अधिक सदस्य आणि 13 कोटींहून अधिक व्ह्यूज असलेले 'केपीएस न्यूज' चॅनल सरकारशी संबंधित योजना, आदेश आणि निर्णयांची माहिती देते जसे की एलपीजी सिलिंडर 20 रुपयांना आणि पेट्रोलची उपलब्धता 15 प्रति लीटर बद्दल खोट्या बातम्या पसरवत होते.

अर्न इंडिया टेक आधार कार्ड, पॅनकार्डबाबत खोट्या बातम्या देत होते

याचबरोबर कॅपिटल टिव्हीचे 35 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. आणि 160 कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. हे चॅनल पंतप्रधान, सरकार आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट घोषणेशी संबंधित आदेशांबद्दल खोट्या बातम्या पसरवत होते. 30 लाखांहून अधिक अधिक सदस्य आणि 10 कोटींहून अधिक व्ह्यूज असलेले 'यहाँ सच देखो' हे YouTube चॅनल निवडणूक आयोग आणि भारताच्या सरन्यायाधीशांबद्दल खोट्या बातम्या पसरवत होते. 31,000 हून अधिक सदस्य आणि 3.6 कोटींहून अधिक व्ह्यूजसह Earn India Tech, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतरांशी संबंधित खोट्या बातम्या प्रसारित करताना आढळले. कारवाई करत सरकारने या सर्व वाहिन्या बंद केल्या आहेत. सरकारशी संबंधित आदेश आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट जाहीर केल्याबद्दल खोट्या बातम्यांचा प्रचार करत होता. 

महत्त्वाच्या बातम्या :

Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या दरांत घट; देशात पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP On Mahapalika Election |  मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special ReportNew India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special ReportShanishingnapur Shanidev | एक मार्चपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक Special ReportSpecial Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.