How To Download Instagram Reels : आता थेट इंस्टाग्रवरुन रिल्स डाऊनलोड करता येणार; जाणून घ्या Step By Step प्रोसेस...
इन्स्टाग्रामकडून आता पब्लिक रील डाऊनलोड करण्याची परवानगी मिळाली आहे. इन्स्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी घोषणा केली आहे,
How To Download Instagram Reels : इन्स्टाग्रामकडून आता पब्लिक रील डाऊनलोड (Instagram Reels)करण्याची परवानगी मिळाली आहे. इन्स्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी घोषणा केली आहे, आपण जागतिक स्तरावरील सार्वजनिक रील त्यांच्या अकाऊंटवरून डाउनलोड करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डाउनलोड केलेल्या रील्स थेट कॅमेरा रोलमध्ये किंवा गॅलरीत येतील. हे फीचर सुरुवातीला जूनमध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते पण आता डाऊनलोडचा पर्याय पब्लिक रील्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हे फीचर आयओएस तसेच अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध असेल.त्यामुळे आता आपल्याचा हवं ते रील डाऊनलोड करता येणार आहे.
टिकटॉकसारखे व्हिडीओ डाऊनलोड करता येणार
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकमध्ये असे फीचर देण्यात आला होता. यामध्ये युजर्सला शेअर बटणाच्या खाली डाऊनलोडचा पर्याय मिळत होता. मात्र खऱ्या निर्मात्यांच्या रील्सचा गैरवापर कोणीही करू शकतात त्यामुळे गॅलरीत सेव्ह केलेल्या रील्स वॉटरमार्कने दाखविण्यात येणार आहेत. यात क्रिएटर्सच्या इन्स्टाग्राम युझरशिपचा समावेश असेल.
कोण डाऊनलोड करू शकेल?
हे अपडेट सध्या सर्व पब्लिक अकाऊंटसाठी असेल. याच्या मदतीने कोणीही इन्स्टाग्राम रील्स डाऊनलोड करू शकणार आहे. यासाठी तुम्हाला मेन युझरच्या खात्यात आणि नंतर सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जावे लागेल. 18 वर्षांखालील इन्स्टाग्राम युजर्ससाठी हे फीचर डिअॅक्टिव्हेट करण्यात येणार आहे.
मेन युझर्सने कोणत्या सेटींग्स कराव्या?
-प्रथम रील रेकॉर्ड करा आणि नंतर खाली उजवीकडे पुढील पर्यायावर टॅप करा.
-यानंतर स्क्रोल डाऊन ऑप्शनवर क्लिक करा.
-यानंतर अॅडव्हान्स सेटिंग्स ऑप्शनवर टॅप करावं लागेल.
-त्यानंतर लोकांना आपल्या रील्स डाऊनलोड करण्याची परवानगी द्या Allow poeple to downlaod your reels यावर टॅप करा.
-यानंतर सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जाऊन टॉगल ऑन किंवा ऑफ करा.
-यानंतर तुम्ही सर्व डाऊनलोड इनेबल किंवा डिसेबल करू शकाल.
-यानंतर वरच्या डावीकडे रिटर्न ऑप्शनवर टॅप करा.
-यानंतर खालच्या बाजूला असलेल्या शेअर ऑप्शनवर टॅप करा.
-यानंतर रील्स डाऊनलोड करता येतील.
सध्या अनेक लोक इंस्टाग्रामवर अनेक प्रकारचे रिल्स बघत असतात. काहींना हे रिल्स मोबाईलमध्ये सेव्ह करुन घ्यायचे असतात. या रिल्समध्ये स्किन केअर आणि अनेक प्रकारचे रिल्स असतात जे अनेकदा कामी पडू शकतात. मात्र हे रिल्स सेव्ह करण्यासाठी या पूर्वी मोठी प्रोसेस करावी लागत होती. आता ही प्रोसेस सोपी झाली आहे.