एक्स्प्लोर

व्हॉट्सॲपवर आलेलं 'Meta AI' फीचर आहे तरी काय? जगातली सगळी माहिती एका क्लीकवर?

मेटाने नवे फीचर आणले आहे. मेटा एआय असे त्याचे नाव आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपवर आले असून या फीचरच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं झटक्यात मिळू शकतात.

मुंबई : सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं असून यामुळे आपलं जगणं आणखी सोपं झालं आहे. तंत्रज्ञानाच्या या जगात आता कृत्रिम बुद्धीमत्तेनं प्रवेश केला असून या नव्या तंत्राने तर सगळे मापदंडच मोडून काढून काढले आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर कठीणातील कठीण काम चुटकीसरशी होत आहे. चॅट जीपीटी हेदेखील कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावरच आलेलं तंत्रज्ञान आहे. गणिताचा प्रश्न असो की आपल्या आरोग्याशी निगडित एखादी अडचण असो, चॅट जीपीटीला प्रश्न विचारल्यावर आपल्याला त्याची वेगवेगळी उत्तरं भेटतात. दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटा या कंपनीने मेटा एआय (Meta AI) नावाचं नवं फीचर आणलं आहे. ज्याला तुम्ही चॅट जीपीटीप्रमाणेच सगळं काही विचारू शकता. हे फीचर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर दिसत आहे. 

भारतात प्रायोगिक तत्त्वावर मेटा एआय लाँन्च

मेटा चे मेटा एआय हे फीचर याआधीच अनेक देशात चालू आहे. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, घाना, न्यूझिलंड, नायजेरिया, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, युगांडा, झांबिया, झिंम्बाब्वे या देशांचा समावेश आहे. हे फीचर आता भारतातही आले असून सध्या ते प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आले आहे. या फीचरचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी करता येतो. 

मेटा एआय काय आहे? 

अनेकांच्या अपडेटेड व्हॉट्सअॅपवर सध्या मेटा एआय नावाचे नवे फीचर दिसत आहे. व्हॉट्सअॅपच्या उजव्या कोपऱ्यात न्यू चॅट ऑप्शनच्या वर निळ्या-जांभळ्या रंगाचं एक वर्तुळ दिसत आहे. ते वर्तुळ म्हणजेच नव्याने लाँन्च झालेले मेटा एआय हे फीचर आहे. या फीचरवर तुम्ही क्लीक केल्यावर चॅटिंगचा ऑप्शन खुला होतो. एखाद्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीने मेसेज करतो, अगदी त्याच पद्धतीने संदेशाच्या माध्यमातून या मेटा एआयला आपण वेगवेगळे प्रश्न विचारायचे. त्यानंतर मेटा एआय आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतं. मेटा एआयला काही विचारायचे असल्यास तुम्ही चॅट्स ऑप्शनमध्ये जाऊन वर सर्च बारमध्ये @MetaAI असं सर्च करू शकता. त्यानंतर लगेच तुम्हाला मेटा एआयशी चॅटिंगच्या मदतीने संवाद साधता येईल.

मेटा एआय इमेजही तयार करून देतं

मेटा एआय सध्यातरी शक्य त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत आहे. विशेष म्हणजे तुम्हाला एखादी इमेज हवी असेल तर तुम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे मेटा एआय तुम्हाला इमेजदेखील तयार करून देतं. ही नवी इमेज आपल्याला अवघ्या काही सेकंदांत तयार करून मिळते. या फीचरच्या मदतीने तुम्हाला हवा असलेला फोटो तयार करून तो इतरांना शेअरही करू शकता. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सध्या हा ऑप्शन सर्वच व्हॉट्सॲपवर उपलब्ध नाही. हळूहळू सर्व वापरकर्त्यांना हा पर्याय उपलब्ध होणार आहे. इन्स्टाग्रामवरही मेटा एआय वापरता येत आहे. 

हेही वाचा :

ICICI बँकेच्या ग्राहकांचा डेटा लीक? तब्बल 17 हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय; सामान्यांवर काय परिणाम?

SBI चा शेअर भलताच खातोय भाव, तुम्हीही होऊ शकता मालामाल! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

घसरणीचा ट्रेंड संपला, आज सोन्याच्या दरात तेजी, कोणत्या शहरात किती दर?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Embed widget