(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पॉवरफुल कॅमेरा, 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह iQOO Z9 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च; Redmi Note 13 Pro ला देणार जबरदस्त टक्कर!
iQOO Z9 5G Smartphone Launched In India : iQoo ने भारतात आणखी एक स्वस्त गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 16GB पर्यंत रॅम, 50MP फ्लॅगशिप कॅमेरा यांसारख्या अनेक फीचर्ससह उपलब्ध आहे.
iQOO Z9 5G Smartphone Launched In India : iQOO Z9 5G हा स्मार्टफोन (Smartphone) भारतात 20 हजारांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे.या स्मार्टफोनची काही वैशिष्ट्य आहेत जी इतर स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कदाचितच मिळतील. जसे की, यामध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेटसाठी सपोर्ट असेल. या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग फीचरसह 5,000mAh बॅटरी आहे.तर, 50MP Sony IMX882 ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असणार आहे. या स्मार्टफोनची आणखी काही वैशिष्ट्य जाणून घेऊयात.
स्मार्टफोनची किंमत किती?
iQOO Z9 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे – 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB. या स्मार्टफोनची रॅम अक्षरशः 8GB ने वाढवता येते. तुम्हाला जर हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या स्मार्टफोनची बेस व्हेरिएंट लॉन्च किंमत 19,999 रुपये आहे. तसेच, त्याचा टॉप व्हेरिएंट 21,999 रुपयांना येतो. या स्मार्टफोनची पहिली विक्री 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर आयोजित केली जाईल. प्राईम यूजर्ससाठी हा स्मार्टफोन 13 मार्च रोजी म्हणजेच आज उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन आजही खरेदी करू शकता.
या स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला हा स्मार्टफोन ICICI आणि HDFC बँक कार्ड्सवर खरेदी केल्यास 2,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. याशिवाय फोनच्या खरेदीवर 3 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय ऑफर देखील दिली जाईल.
iQOO Z9 5G चे स्पेसिफिकेशन्स
iQOO च्या या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह MediaTek Dimensity 7200 चिपसेटसाठी सपोर्ट असेल. सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर असेल. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Funtouch OS वर काम करेल.
विवोच्या सब-ब्रँडचा हा गेमिंग स्मार्टफोन पॉवरफुल कॅमेरासह येतो. फोनमध्ये OIS आणि EIS सपोर्टसह 50MP Sony IMX882 कॅमेरा असेल. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 2MP Bokeh कॅमेरा देण्यात आला आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा असेल. या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग फीचरसह 5,000mAh बॅटरी आहे.
कोणाशी स्पर्धा करणार?
iQOO Z9 5G हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर Redmi Note 13 Pro, Realme 12+ यांसारख्या स्मार्टफोनला जबरदस्त टक्कर देणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :